छत्रपती शिवरायांची लष्करी नीती, प्रशासकीय धोरणावर होणार मंथन...

By अमित महाबळ | Published: December 24, 2023 08:03 PM2023-12-24T20:03:26+5:302023-12-24T20:03:53+5:30

१६ फेब्रुवारी रोजी भारतीय सांस्कृतिक परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे बीजभाषण होणार आहे.

Chhatrapati Shivaji's military policy, administrative policy will be brainstormed | छत्रपती शिवरायांची लष्करी नीती, प्रशासकीय धोरणावर होणार मंथन...

छत्रपती शिवरायांची लष्करी नीती, प्रशासकीय धोरणावर होणार मंथन...

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कला व मानव्य प्रशाळा अंतर्गत संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने दि. १६ व १७ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी नीती आणि प्रशासकीय धोरणांची आधुनिक युगातील प्रासंगिकता’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे.

चर्चासत्रात दि. १६ फेब्रुवारी रोजी भारतीय सांस्कृतिक परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे बीजभाषण होणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज : राष्ट्रबांधणी करणारे सर्वोत्कृष्ट नेतृत्व’ या विषयावर ते मांडणी करतील. निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी (छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय लष्करी शक्तीचे पुनरुज्जीवन आणि आधुनिक काळाशी त्यांची समयोचितता), डॉ. श्रीकांत परांजपे (छत्रपती शिवाजी महाराज : सर्वोत्कृष्ट सामरिक विचारवंत), माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर (छत्रपती शिवाजी महाराज : गुप्तहेर खाते आणि सध्याच्या हेर खात्यासाठी धडे), पुण्यातील ऐतिहासिक संशोधन मंडळाचे सदस्य विक्रमसिंग बाजी मोहिते (छत्रपती शिवाजी महाराज : दक्षिण दिग्विजय आणि त्यांचे सामरिक महत्त्व), नाशिकच्या हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रकाश पाठक (छत्रपती शिवाजी महाराज : गनिमी कावा युद्धपद्धती आणि आधुनिक युद्धपद्धतीत त्यांचे महत्त्व), छत्रपती शिवाजी महाराज रायगड मेमोरियल मंडळाचे संचालक रघुजी राजे आंग्रे (छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय नौदलाचे पितामह, शिवकाळातील नौदलाची नीती आणि त्यांचे शत्रूंवर झालेले परिणाम), महाराष्ट्र शासनाच्या किल्ले रायगड प्राधिकरणाचे सल्लागार सुधीर थोरात (छत्रपती शिवाजी महाराज : स्वराज्यातील प्रशासन आणि सध्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठीचे धडे), डेक्कन कॉलेज पुरातत्त्व विभागाचे डॉ. सचिन जोशी (शिवकाळातील किल्ले : किल्ल्यांचे भूसामरिक महत्त्व), किल्ले रायगड संवर्धन आर्किटेक्ट रायगड प्राधिकरणाचे वरुण भामरे ( शिवकाळातील किल्ले : किल्ल्यांचे लष्करी स्थापत्यशास्त्र आणि त्यांचे जतन) हे मान्यवर सहभागी होणार आहेत. यशस्वीतेसाठी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे हे कार्याध्यक्ष, प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ. रामचंद्र भावसार हे समन्वयक आणि संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे डॉ. तुषार रायसिंग हे सचिव म्हणून काम पाहत आहेत.
 

Web Title: Chhatrapati Shivaji's military policy, administrative policy will be brainstormed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव