भुसावळ मुख्याधिकारी यांना धक्काबुक्की
By Admin | Published: March 27, 2017 01:16 PM2017-03-27T13:16:25+5:302017-03-27T13:16:25+5:30
सर्वसाधारण सभेत विरोधकांनी इतिवृत्त वाचण्याचा हट्ट धरल्याने वाद विकोपाला जावून गोंधळातच विकासाच्या 121 विषयांना मंजुरी देण्यात आली़ अवघ्या 15 मिनिटात सभा आटोपली
गोंधळातच सर्व विषयांना मंजुरी: इतिवृत्त वाचण्यावरून वाद
भुसावळ, दि.27- नगरपालिका निवडणुकीनंतर सोमवार 27 रोजी झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी इतिवृत्त वाचण्याचा हट्ट धरल्याने वाद विकोपाला जावून गोंधळातच विकासाच्या 121 विषयांना मंजुरी देण्यात आली़ अवघ्या 15 मिनिटात सभा आटोपली तर विरोधकांनी मुख्याधिका:यांच्या कार्यपद्धत्तीविरोधात रोष व्यक्त केला असून सत्ताधा:यांनी त्यांना हायजॅक केल्याचा आरोप केला तर मुख्याधिका:यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. विरोधी नगरसेवकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पत्रकार परीषदेत दिली़
सोमवारी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली़ पीठासन अधिकारी रमण भोळे होत़े व्यासपीठावर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर उपस्थित होत़े
15 मिनिटात आटोपली सभा
सकाळी 11 वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली़ विषयसुचीत पहिल्याच विषयाचे वाचन होत असताना विरोधी नगरसेवक पुष्पा सोनवणे, उल्हास पगारे, रवींद्र सपकाळे, दुर्गेश ठाकूर, अॅड.तुषार पाटील, कविता अशोक चौधरी यांनी पालिकेत पायी मोर्चा आणत मुख्याधिकारी ‘चले जाव’च्या घोषणा देत प्रवेश केला़ सभागृहात विरोधकांनी येत जोरदार घोषणाबाजी केली़ सभेला पुन्हा आधीपासून सुरुवात करा, अशी मागणी करण्यात आली तर सभेचा पहिलाच विषय 20 ऑगस्ट 2016 च्या सभेचे कार्यवृत्त कायम करण्याचा असल्याने तो पूर्णपणे वाचून दाखवावा, अशी मागणी केल्याने सभेत गोंधळ उडाला़ विरोधक आक्रमक झाल्यानंतर सत्ताधा:यांनी आवाजी मतदानाने सर्व विषय मंजूर-मंजूर म्हणत सभागृहाबाहेर पाय काढला़ अवघ्या 15 मिनिटात सभा आटोपण्यात आली़
मुख्याधिका:यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप
सभा आटोपल्याने विरोध संतप्त झाल्यानंतर मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना काही नगरसेवकांनी कडे करत सभागृहाबाहेर काढले तर यावेळी पुष्पा सोनवणे, रवींद्र सपकाळे, उल्हास पगारे, संतोष (दाढी) चौधरी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप मुख्याधिका:यांनी केला आहे. त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले शिवाय जिल्हाधिका:यांकडे याबाबत संबंधिताना अपात्र करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे बाविस्कर म्हणाल़े
सत्ताधारी म्हणतात गुंडगिरी खपवून घेणार नाही
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, आजचा प्रकार अत्यंत निंदणीय आह़े सर्वच प्रभागातील विकासाचे विषय होते मात्र विरोधकांचे वैयक्तिक विषय होवू नये यासाठी हा खटाटोप करण्यात आला़ मुख्याधिका:यांना झालेली धक्काबुक्की दुदैर्वी बाब आह़े
उपनगराध्यक्ष युवराज लोणारी म्हणाले की, मुख्याधिकारी कर्तव्यदक्ष आहे, सत्ताधारी त्यांच्या पाठीशी आहेत़ विरोधकांना सभा चालू द्यायची नव्हती म्हणून त्यांनी गोंधळ घातला़
प्रा़ सुनील नेवे म्हणाले की, सर्वसाधारण सभेतील प्रकार लांच्छनास्पद आह़े