मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 20:30 IST2023-05-09T20:30:11+5:302023-05-09T20:30:22+5:30
मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जातेय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
प्रशांत भदाणे
जळगाव- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (10 मे) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येताय. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला त्यांची उपस्थिती असणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचं दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी शासकीय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. यासंदर्भातला दौरा जिल्हा प्रशासनाला मंगळवारी सायंकाळी उशिरा प्राप्त झालाय.
जळगाव जिल्ह्यातील चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांची कन्या अमृता हिचा विवाह सोहळा उद्या जळगावातील एम. जे. कॉलेजच्या एकलव्य क्रीडा मैदानावर होत आहे. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी राहणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच अनेक मंत्री व आमदार या विवाह सोहळ्याला हजर राहण्याची शक्यता आहे. विवाह सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्री जळगाव विमानतळावरून शासकीय विमानाने लातूरकडे रवाना होणार असल्याचा दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जातेय.