मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 09:00 PM2018-07-24T21:00:24+5:302018-07-24T21:04:00+5:30
आरक्षणाच्या विषयावर आंदोलकांना झुलवत ठेवत मुख्यमंत्री बुद्धीभेद करीत आहेत. त्यामुळे हजारो शेतकºयांच्या आत्महत्या आणि आता काकासाहेब शिंदे या मराठा तरूणाचा बळी घेणा-या मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जळगाव : आरक्षणाच्या विषयावर आंदोलकांना झुलवत ठेवत मुख्यमंत्री बुद्धीभेद करीत आहेत. त्यामुळे हजारो शेतकºयांच्या आत्महत्या आणि आता काकासाहेब शिंदे या मराठा तरूणाचा बळी घेणा-या मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच मयत शिंदे यांना आदरांजलीही वाहण्यात आली.
दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व समाजबांधव जिल्हाधिकारी कार्यालयात जमले. जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये व्यस्त असल्याने उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांना निवेदन देण्यात आले. डॉ.राजेश पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका मांडली. त्यात लाखोंचे शिस्तबद्ध ५८ मोर्चे काढणाºया मराठा समाजाच्या मागण्यांवर विचार न करता सरकारने अत्यंत थंड प्रतिसाद दिल्याने पुन्हा आंदोलन सुरू झाले असून आषाढी एकादशीच्या दिवशी काकासाहेब शिंदे या २६ वर्षांच्या मराठा तरूणाचा या सरकारने बळी घेतला आहे. त्याबद्दल सरकारचा निषेध करीत असून मुख्यमंत्र्यांनी हजारो शेतकºयांच्या आत्महत्या आणि काकासाहेब शिंदे या मराठा तरूणाच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.