जनआरोग्य योजना अधिक व्यापक स्वरूपात राबविणार- मुख्यमंत्री
By admin | Published: April 30, 2017 05:50 PM2017-04-30T17:50:38+5:302017-04-30T17:50:38+5:30
नंदुरबार येथे महाआरोग्य शिबिर. एक लाखापेक्षा जास्त रुग्णांची झाली तपासणी.
नंदुरबार,दि. 30- म.फुले जनआरोग्य योजना नव्या स्वरूपात आणि अधिक व्यापक स्वरूपात सुरू करण्यात येत असल्याची माहिती देवून नंदुरबारात पुढील वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रय} राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलतांना दिली.
नंदुरबारात रविवारी आयोजित महाआरोग्य शिबिरास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरिष चौधरी, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार चंदू पटेल, शरद ढोले, बाळासाहेब चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, सर्वासाठी आरोग्य ही संकल्पना राज्य सरकारची आहे. त्यामुळे पूर्वीची राजीव गांधी आरोग्य योजना आता म.फुले जनआरोग्य योजना या नावाने अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. कुणीही वैद्यकीय उपचारांअभावी वंचीत राहू नये यासाठी शासनाचे प्रय} आहेत. नंदुरबारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आधीपासूनच मंजूर आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी त्यासाठी प्रय}ही केले. आता पुढील वर्षापासून हे महाविद्यालय सुरू होईल यासाठी आपला प्रय} राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री डॉ.सुभाष भामरे, गिरीश महाजन, जयकुमार रावल, इंद्रदेवजी महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले.