अमळनेर नगराध्यक्षांना अपात्रतेतून वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:19 PM2018-01-27T22:19:44+5:302018-01-27T22:22:04+5:30

पत्रपरिषद: राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांचा आरोप

Chief Minister's intervention to save the disaster from Amalner | अमळनेर नगराध्यक्षांना अपात्रतेतून वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

अमळनेर नगराध्यक्षांना अपात्रतेतून वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

Next
ठळक मुद्दे पालकमंत्र्यांना राष्ट्रध्वज फडकविण्यास वेळ नाही आमदार किशोर पाटील यांची नौटंकी !

जळगाव- अमळनेर येथील भाजपाच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील आणि 23 नगरसेवकांना अपत्राता प्रकरणातून वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने हा निकाल सध्या राखीव ठेवला गेला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पत्रपरिषदेत केला. शनिवारी दुपारी राष्ट्रवादीच्या येथील जिल्हा कार्यालयात ही पत्रपरिषद झाली. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ व अरुण पाटील, अॅड. रवींद्र पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष ललित बागुल, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, नामदेव चौधरी आदी उपस्थित होते. पत्नीला वाचविण्यासाठी साहेबराव भाजपात ! राष्ट्रवादीचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सत्तेचा लाभ मिळविण्यासाठी पत्नी पुष्पलता पाटील या नगराध्यक्ष असतानाही भाजपात पाठविले व आपण स्वत: राष्ट्रवादीतच आहे, असेही स्पष्ट केले. मात्र शहरातील अतिक्रमणांना स्थगिती दिल्याच्या प्रकरणात आमदार शिरीष चौधरी गटाने जिल्हाधिकारी यांच्याकडे नगराध्यक्षा व 23 नगरसेवक अपात्र करावे अशी मागणी केली. या प्रकरणात अभय मिळवून देण्याचा शब्द स्थानिक भाजपा नेत्यांकडून मिळाल्याने साहेबराव पाटील हे भाजपात गेले. मात्र जिल्हाधिकारी यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या प्रकरणात न ऐकल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला. यामुळे काही दिवसांपूर्वी जाहीर होणारा हा निकाल सध्या राखून ठेवला गेला आहे, असेही डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले. पालकमंत्र्यांना राष्ट्रध्वज फडकविण्यास वेळ नाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्ह्याच्या बाबतीत नेहमीच उदासिन आहेत, असेही डॉ. सतीश पाटील म्हणाले. 26 जानेवारीला ते पुन्हा एकदा दिसून आले. त्यांनी ङोंडा फडकविण्यासही वेळ दिला नाही. दुस:यास पाठवून दिले. एखाद्याच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमास सर्व मंत्री हजर राहतात मात्र महत्वाच्या कार्यक्रमांनाही वेळ दिला जात नाही, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. जिल्ह्यातील काही मोठे नेते राष्ट्रवादीत येणार राष्ट्रवादीतील जावक बंद झाली असून आता काही मोठे नेते राष्ट्रवादीत लवकरच दाखल होणार आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठा हादारा बसणार आहे, अशी महितीही डॉ. सतीश पाटील यांनी दिली. याचबरोबर भाजपाचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ‘पक्ष बाहेर ढकलत आहे’ या विधानाचाही उल्लेख सूचकपणे केला. भाजपाचे वारंवार बोलावणे- दिलीप वाघ भाजपात प्रवेशासाठी काही दिवसांमध्ये आपणास 4 वेळा बोलावणे झाले. परतु आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी स्पष्ट केले. जलसंपदा गिरीश महाजन यांची निवडणुकीच्या दृष्टीने स्थिती नाजूक असल्याने पाचोरा तालुक्यातील लोहारा गटाची मदत व्हावी या हेतूने दिलीप वाघ यांना भाजपात घेण्यासाठी प्रयत्न केले गेले, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. तर पाचो:यात शिवसेनेचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार आर. ओ. पाटील यांचे मताधिक्य घटवून त्याचा फायदा खासदार ए. टी. पाटील यांना मिळावा म्हणूनही आपणास भाजपाकडे खेचण्याचा प्रयत्न झाला, असेही दिलीप वाघ यांनी सांगितले. तर जलसंपदा मंत्री म्हणून महाजन हे अपयशी झाले असून गिरणेवरील 7 बलून बंधारे म्हणजे फेकंफाक होती, असेही डॉ. पाटील होते. आमदार किशोर पाटील यांची नौटंकी ! आमदार डॉ. सतीश पाटील यांनी गिरणेच्या आवर्तनासाठी उपोषण केले त्यावेळीच दोन महिन्यात आवर्ततन सोडले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र आमदार किशोर पाटील यांनी त्यावेळी पाणी नियोजनाबाबत अधिका:यांशी चर्चा न करता आता ऐनवेळी काही ठिकाणी पाणी पोहचले नाही म्हणून आरडा ओरड करुन नौटंकी करीत आहे. खरच काळजी असती तर अधीच नियोजन केले असते, असेही माजी आमदार दिलीप वाघ पत्र परिषदेत म्हणाले. आघाडी होण्याचे संकेत मुंबई येथील संविधान बचाव कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काँग्रेससोबत आघाडीचे संकेत दिले, असल्याचे सांगत डॉ. सतीश पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेस चांगली कामाला लागल्याबद्दलही कौतुक केले.

Web Title: Chief Minister's intervention to save the disaster from Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.