मुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा अन् प्रशासनाची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:04 PM2018-10-06T13:04:09+5:302018-10-06T13:05:31+5:30
महत्वाकांक्षी योजनांचा आढावा
जामनेर येथील उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन
विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ नामकरण सोहळ्यास उपस्थिती
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार, ८ आॅक्टोबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने जिल्हा प्रशासनाची तयारीसाठी धावपळ उडाली आहे. मात्र यासंदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ती तारीख पुढे ढकलली असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या महत्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरूवात शुक्रवारी नाशिक जिल्ह्यापासून झाली. नाशिक येथील बैठक आटोपल्यावर मुख्यमंत्री ८ रोजी जळगावचा दौरा करणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.
हे आहेत नियोजित कार्यक्रम
मुख्यमंत्री जामनेर येथील उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन करून विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ नामकरण सोहळ्यास उपस्थिती देणार असल्याचे तसेच बंदीस्त नाट्यगृहाचे उद्घाटन असा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाला समजला होता. मात्र विद्यापीठाने दोन दिवसांत या कार्यक्रमाची तयारी करणे अवघड असल्याचे सांगितल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौºयाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.