बालकाचा डोहात बुडून करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:53 AM2017-08-30T00:53:33+5:302017-08-30T01:02:54+5:30

जामनेर येथे आठ वर्षीय बालक खेळताना दुपारी घरातून गेला अन् सायंकाळी मृतदेहच आढळल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

The child is in the dawn of the end, | बालकाचा डोहात बुडून करुण अंत

बालकाचा डोहात बुडून करुण अंत

Next
ठळक मुद्देपालिकेने बांधलेल्या घरकुलात अल्पसंख्याक समाजातील कुटुंबे मोठय़ा संख्येने वास्तव्यास आहेत. त्यांची लहान मुले दिवसभर घराबाहेर खेळत असतात. पालिकेने या घरकुलाजवळील नाल्यातील खड्डय़ांचे सपाटीकरण करणे आवश्यक आहे. मात्र याची दखल न घेतल्याने बालकाचा डोहात बुडून मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप आहे. जामनेर पालिकेने खड्डय़ांचे सपाटीकरण वेळीच केले असते तर ही दुर्घटना घडली नसती, अशी संतप्त भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

ऑनलाईन लोकमत जामनेर, जि. जळगाव, दि. 29 : येथील पालिकेच्या घरकुलात राहणा:या आठ वर्षीय कलीमखान शरीफखान या बालकाचा आठ फूट खोल डोहात बुडून मृत्यू झाला. तो मंगळवारी दुपारी दोन वाजेपासून बेपत्ता होता. सायंकाळी साडेपाचला त्याचा मृतदेहच आढळला. कलीमखान शरीफखान हा इयत्ता दुसरीत शिकणारा बालक पालिकेने दूरध्वनी कार्यालयाजवळ बांधलेल्या घरकुलात वास्तव्याला आहे. मंगळवारी दुपारी दोनला तो इतर मुलांसोबत खेळायला घराबाहेर पडला. सायंकाळी पाच वाजेर्पयतदेखील तो घरी परतला नाही. यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. या घरकुलाजवळ मोठा नाला आहे. या ठिकाणी पाणी साचून डोह तयार झाला आहे. या डोहात त्याचा मृतदेह आढळला. सोमवारी रात्रीपासून जामनेरात पाऊस सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. पावसाच्या पाण्याची या डोहात आणखी भर पडली. या दुर्दैवी घटनेमुळे या भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तलाठी नितीन मनुरे यांनी पंचनामा केला.

Web Title: The child is in the dawn of the end,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.