छतावरील दगड झोक्यात पडल्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:54 PM2017-07-31T12:54:41+5:302017-07-31T12:55:46+5:30

तांबापुरातील घटना : ताडपत्री टाकताना तुटली दांडी

Child death due to roof collapsing | छतावरील दगड झोक्यात पडल्याने बालकाचा मृत्यू

छतावरील दगड झोक्यात पडल्याने बालकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमुलगा उठत नसल्याने आईचा आक्रोश़़़पाऊस व पार्टेशनच्या घराने केला घातजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी असदला मृत घोषीत केले.  

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31 -  पावसाचे पाणी घरात येऊ नये यासाठी छतावर ताडपत्री टाकत असताना एक जीर्ण लाकडी दांडी तुटल्याने रऊफ हकीम पटेल (वय 28) हे छतावरील दगडासह घरात कोसळले, याचवेळी झोक्यात निजलेल्या दोन वर्षाच्या असद या बालकाच्या अंगावर दगड पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी दीड वाजता तांबापुरातील अजमेरी गल्लीत घडली. या घटनेमुळे तांबापुरात शोककळा पसरली.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, रऊफ हकीम पटेल यांचे तांबापुरातील अजमेरी गल्लीत पार्टेशनचे लहानशे घर आहे. त्यात पत्नी साजेदा, मुलगी हुमेरा (वय 4), रोजमीन (वय 3), मुलगा असद (वय 2), बहिण फरीदा व तिचे दोन मुले, आई मेहमुदा यांच्यासह एकत्र वास्तव्याला आहेत. हातगाडीवर भंगार गोळा करुन त्यावर सर्वाचा उदरनिर्वाह चालतो. 
पार्टेशन व पत्र्याचे घर असल्याने पावसाचे पाणी घरात येत होते. त्यामुळे रऊफ पटेल हे  रविवारी दुपारी दीड वाजता छतावर ताडपत्री व प्लास्टीकचा कागद टाकण्यासाठी छतावर चढले असता  ही दुर्घटना घडली.
  दांडी तुटल्यामुळे दगडासह रऊफ खाली कोसळल्याने जोराचा आवाज झाला. हा आवाज ऐकून असदची आई साजेदा धावतच आली व असदला जवळ घेऊन पाहिले तर तो काहीच बोलत नव्हता. तो का बोलत नाही म्हणून त्यांनी जोरात किंचाळी मारली, शेजारीही धावून आले. आवाज देऊनही असद उठत नव्हता, तर आईची स्थिती पाहता शेजारच्यांनी तातडीने असद याला जिल्हा रुग्णालयात तर त्याच्या वडीलांना खाजगी दवाखान्यात हलविले. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी असदला मृत घोषीत केले.  

Web Title: Child death due to roof collapsing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.