मतदान केंद्रांवर चिमुरडे रमले खेळण्यांपाशी! मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; वयाची १०० गाठणारेही सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:40 AM2024-05-13T11:40:53+5:302024-05-13T11:41:21+5:30
दोन्ही मतदारसंघातील बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र सकाळपासूनच दिसायला लागले. प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधांचा आधार घेत ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी सरसावले.
कुंदन पाटील
जळगाव : लोकसभेच्या जळगाव आणि रावेर मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागल्याचे चित्र दिसून आले आहे.सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे ६.१४ व ७.१४ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अनेक माता बाळांना मतदान केंद्रांवर पाळणाघरात सोडून मतदानासाठी सरसावल्या. तेव्हा चिमुरड्या लेकरांनी खेळण्यांशी मौजमस्ती करीत मनमुराद आनंद घेतल्याचे चित्र दिसून आले.
दोन्ही मतदारसंघातील बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र सकाळपासूनच दिसायला लागले. प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधांचा आधार घेत ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी सरसावले.
नवमतदार सरसावला
सकाळी पहिल्यांदाच मतदान करणारा वर्ग मोठ्या संख्येने दिसून आला. तसेच प्रशासनाने दिव्यांगांसाठी केलेल्या सोयीचा हातभार घेत अनेक जण मतदान केंद्रांवर पोहोचले.