मुलं रमली मातीमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:36 IST2018-08-28T18:35:31+5:302018-08-28T18:36:09+5:30
उमंग शाळेचा उपक्रम : सल्लोषात साजरा झाला दिवस

मुलं रमली मातीमध्ये
चाळीसगाव, जि.जळगाव : मंगळवारी उमंग सृष्टी स्कूलमध्ये रेन व मड प्रोजेक्ट घेण्यात आला. यात मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. आजच्या काळात पालक आपल्या मुलांना मातीत जास्त खेळू देत नाहीत. पूर्वीच्या काळी मुले मातीतले खेळ खेळायचे. त्यामुळे त्यांच्यात एक वेगळीच सकारात्मकता असे. आता मुले मातीत खेळ खेळणे विसरत चालली आहेत. त्याचा परिणाम हा मानसिक, शारीरिक स्वास्थ्यावर होत असतो, तर त्या मातीच्या सानिध्यात मुलांना एक दिवस घालवता यावा म्हणून उमंग सृष्टी स्कूलमध्ये मड प्रोजेक्ट घेण्यात आला.
यात मुलांना पाऊस कसा पडतो हे सांगण्यात आले. यात मुलांना प्रोजेक्टरवर पाऊस कसा पडतो हे दाखविण्यात आले. त्यानंतर मुलांना प्रत्यक्ष पाऊस कसा पडतो याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. मुलांना खेळण्यासाठी वॉटर पार्क बनविला होता. त्यात मुले मनसोक्त खेळली. वॉटर पार्कमध्ये स्लाईडने उतरत मुलांनी पोण्याचा मनसोक्त आनंद घेतला. त्यानंतर मुलांनी कृत्रिम चिखलाच्या टँकमध्ये खूप चिखल खेळला. त्यांनी हाताचे ठसे उमटविल.े त्या छोट्याशा टँकमध्ये डुबण्याचा आंनंद मुलांनी घेतला. तसेच चिखलाच्या छोट्या कृत्रिम मैदानावर मुलांना नाचत खेळत संगीताच्या तालावर ठेका घेतला. त्यात मुलांनी व पालकांनी मनसोक्त आनंद घेतला.
याप्रसंगी संपदा पाटील, शेख, अर्जुन पाटील, दामिनी वाघ, विजया पाटील, विजया भोकरे, जया महाले, योगिता एरंडे उपस्थित होत्या.