चाळीसगाव येथे बालनाट्य महोत्सवात बालकांची धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:36 AM2018-10-09T00:36:22+5:302018-10-09T00:42:02+5:30

चाळीसगाव येथे तीन संस्था मिळून बालनाट्य महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. यात महाराष्टÑात गाजलेली नाटके सादर करण्यात आली. पाचशेच्यावर बालके आणि त्यांच्या पालकांनी नाटकांचा आनंद लुटला.

 Children's charity at the Balatalya festival in Chalisgaon | चाळीसगाव येथे बालनाट्य महोत्सवात बालकांची धमाल

चाळीसगाव येथे बालनाट्य महोत्सवात बालकांची धमाल

Next
ठळक मुद्देज्येष्ठ रंगकर्मीच्या हस्ते बालकलाकारांना बक्षिसे वितरणज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, प्रवीणकुमार भारदे यांची उपस्थिती

चाळीसगाव : करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे.
अशा प्रभुशी नाते जोडू इच्छिणाऱ्या तीन संस्था एकत्र येवून सुमारे ५०० हून अधिक बालकांचे आणि त्यांच्या पालकांचे धमाल मनोरंजन करणारा भव्य बालनाट्य महोत्सव नुकताच पार पडला.
हा महोत्सव रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव आणि माता अनुसया प्रॉडक्शन, मुंबई यांच्यातर्फे आणि मुख्य प्रायोजक अश्वमेध पब्लिक स्कूल व अनन्या फाउंडेशन, टाकळी प्र. दे. यांच्या सहकार्याने सादर झाला.
या बालनाट्य महोत्सवात महाराष्ट्रभर गाजलेली ‘जंगली बाणा’, ‘ हॅपी बर्थर् डे’ आणि ‘डोरेमोन, निन्ज्या आणि छोटा भीम’ अशी तीन धमाल बालनाट्य सादर झाली. ही मुलांच्या आवडती कार्टून्स मुलांच्या गर्दीत हसली, नाचली त्यामुळे मुलांना खूप मजा आली. नुकत्याच झालेल्या बालनाट्य प्रशिक्षण शिबीरातील मुलांना ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे आणि बालनाट्य रंगकर्मी प्रवीणकुमार भारदे, मुंबई यांच्या सोबत अभिनय करण्याचा आनंददायी अनुभव मिळाला.
सुरवातीला नटराज पूजन नयना आपटे, प्रविणकुमार भारदे, प्रदीप देशमुख, रंगगंध कलासक्त न्यासचे अध्यक्ष डॉ.मुकुंद करंबेळकर, अनन्या फाउंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच तिन्ही संस्थांच्या वतीने बालकलाकारांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन अश्वमेधचे योगेश पाटील यांनी केले. मुख्याध्यापिका उज्ज्वला निरखे यांनी संस्थेबद्दल माहिती दिली. यशस्वितेसाठी मीनाक्षी करंबेळकर, आरती पूर्णपात्रे, प्रवीण अमृतकार, शालीग्राम निकम, प्रकाश कुलकर्णी, गणेश आढाव, रवींद्र शिरुडे, राजेंद्र चिमणपुरे, अविनाश सोनावणे,रवींद्र देशपांडे ,विश्वास देशपांडे आणि उमा चव्हाण या रंगगंधच्या कार्यकर्त्यांचे तसेच अश्वमेधचे जनसंपर्क अधिकारी पियुष गुप्ता आणि त्यांचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.

 

Web Title:  Children's charity at the Balatalya festival in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Theatreनाटक