बदलत्या वातावरणाने बालकांच्या आजारात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 03:52 PM2019-12-17T15:52:24+5:302019-12-17T15:53:10+5:30
बदलत्या वातावरणामुळे व वाढत्या थंडीने लहान मुलांच्या आजारात लक्षणीय वाढ झाली असून, खाजगी व उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
जामनेर, जि.जळगाव : बदलत्या वातावरणामुळे व वाढत्या थंडीने लहान मुलांच्या आजारात लक्षणीय वाढ झाली असून, खाजगी व उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गोरगरीब रुग्ण मोठ्या संख्येने उपजिल्हा रुग्णालयात येत असून उपलब्ध बेड अपूर्ण पडत आहे. गेल्या वर्षी जामनेर व पहूर रुग्णालयासाठी वाढीव ५० खाटांची मंजुरी मिळाली होती, मात्र ती कागदावरच राहिली. जामनेरला रुग्णांची संख्या वाढल्याने एका बेडवर दोन रुग्णांना ठेवण्यात येत आहे.
सध्या थंडीत अचानक वाढ झाल्याने लहान मुलांना सर्दी, खोकला आदी रोगाची लागण वाढली आहे. खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेणाº्या लहान मुलांची संख्या या आठवड्यात वाढली आहे. उपजिल्हा रुग्णालयात सध्या दररोज ४०० ते ५०० रुग्णाची बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जात आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, डॉ.आर.के.पाटील, डॉ.वैशाली चांदा, डॉ.जयश्री पाटील, डॉ.प्रशांत महाजन, डॉ.हर्षल चांदा उपचार करीत आहे.
५० बेड असून रुग्ण संख्या वाढल्यास वाढीव रुग्णांची व्यवस्था करण्यास अडचण येते. परिणामी एका बेडवर दोन रुग्णांना उपचार करावे लागत आहे.
जामनेरला डॉक्टर असल्याने उपचारासाठी अडचण येत नाही, मात्र पहूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरचा नसल्याने मोठी अडचण होत आहे. गेल्या काही दिवसापासून पहूरची रुग्णसेवा बंद पडली आहे. स्थानिक नागरिक व राजकीय कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मागणी करूनदेखील आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. जिल्हा शल्यचिकित्सकानी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
जामनेरला सिझेरिनची सुविधा
दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाºया महिलांना आवश्यकता भासल्यास सिझेरिन करावे लागल्यास, तशी सुविधा उपलब्ध केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे यांनी दिली. गेल्या आठ ते नऊ महिन्यात सुमारे शंभरहून जास्त सिझेरीन केल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील महिलांची मोठी सोय झाली.