बच्चोंकी जान प्यारी है तो पाच लाख रुपये दे!
By Admin | Published: April 10, 2017 01:10 PM2017-04-10T13:10:31+5:302017-04-10T13:10:31+5:30
लोहारा येथील मुद्रांक विक्रेत्याला धमकी : एलसीबीने घेतले पुण्याच्या स्क्रिप रायटरला ताब्यात
जळगाव,दि.10- ‘तेरे दोनो बेटे की और तेरी जान प्यारी है, तो तुरंत पाच लाख रुपये देना’ अशी धमकी देऊन मुद्रांक विक्रेत्याकडे खंडणी मागणा:या विशाल आनंदा माळी (वय 21 रा.लोहारा, ता.पाचोरा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले. पुणे येथे फिल्म निर्मात्याकडे रायटर व प्रसिद्ध अभिनेतील अलिया भटचा तो बाऊंन्सर असल्याची माहिती समोर येत आहे.
शरद रामदास सोनार (वय 50 रा.लोहारा, ता.पाचोरा) हे पाचोरा येथे मुद्रांक विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचा मोठा मुलगा हर्षल हा एसएसबीटी बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तर लहान ऋषीकेश हा शेंदुर्णी येथे शिक्षण घेत आहे. 23 मार्च रोजी मलकापूर येथे सास:याचे निधन झाल्याने ते तेथे जात असताना नाचणखेडा, ता.जामनेर गावाजवळ एका अनोळखी क्रमांकावरुन त्यांच्या मोबाईलवर कॉल आला. हिंदीत टपोरी भाषेत संवाद साधत समोरील व्यक्तीने ‘मैने तेरेको मारने की तीन लाख रुपये की सुपारी ली है, तुङो और तेरे दोनो बच्चो को बचाना है तो मुङो पाच लाख रुपये दे’ अशी धमकी दिली. कोणीतरी मस्करी करीत असावे म्हणून सोनार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा त्याच क्रमांकावरुन फोन आला व पुन्हा तीच धमकी देऊ लागला.
पंधरा दिवसाची मागितली मुदत
दुस:या कॉलमुळे सोनार हे घाबरले व मी गरीब माणूस आहे, माङयाजवळ इतकी रक्कम नाही मला वेळ द्या म्हणून विनंती केली असता त्याने पंधरा दिवसाची संधी दिली. 14 दिवस उलटल्यावर काय करावे सूचत नव्हते. खंडणी मागणा:याने खरोखर काही कृत्य केले तर अशी भीती मनात येत होती, म्हणून सोनार यांनी गावातील चंद्रकांत पाटील, रमेश शेळके, डॉ.चौधरी व म्हसास येथील किसन पाटील या जवळच्या लोकांना ही माहिती दिली. त्यांनी सर्वानी सोनार यांना धीर दिला. त्यामुळे सोनार यांनी 6 एप्रिल रोजी पिंपळगाव हरेश्वर येथे पोलीस स्टेशनला जावून सहायक निरीक्षक संदीप पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. धमकीचा प्रकार पहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने शून्य क्रमांकाने तो पहूरला वर्ग करण्यात आला. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने संशयित आरोपी विशाल माळी याला अटक केली.