जळगावात कुलरच्या शॉकने बालकाचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:40 PM2019-06-29T12:40:08+5:302019-06-29T12:40:36+5:30

खंडेराव नगरातील घटना

Child's compassionate ending with the cooling shawl of Jalgaon | जळगावात कुलरच्या शॉकने बालकाचा करुण अंत

जळगावात कुलरच्या शॉकने बालकाचा करुण अंत

Next

जळगाव: कुलरचा शॉक लागल्याने सहा वर्षीय आरव सुनील भोई (रा़ खंडेरावनगर) या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ शॉक लागल्याने दगावल्याची तीन दिवसातील ही तिसरी घटना आहे.
इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेत असलेला आरव हा शुक्रवारी सकाळी घरात खेळत होता़ खेळता-खेळता पत्र्याच्या कुलरला त्याचा स्पर्श झाला़ अन् क्षणात कुलरमध्ये उतरलेल्या विजेचा त्याला जोरदार धक्का बसला आणि तो खाली कोसळला़ हा प्रकार कुटुंबीयांनी त्याला त्वरित जिल्हा रूग्णालयात नेले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे खंडेरावनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़ आरव याच्या पश्चात आजी-आजोबा आई-वडील, मोठा भाऊ, असा परिवार आहे़ बुधवारी पिंप्राळा हुडको भागात गुरु संतोष माळी (३) आणि गुरुवारी ओम शेखर सोनवणे (१२, रा. मेहरुण) या बालकाचा वीज खांबाचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला होता.

Web Title: Child's compassionate ending with the cooling shawl of Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव