जळगावातील कुटूंब कुलदेवतेच्या दर्शनाला अन् घरात मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 08:29 PM2018-10-14T20:29:44+5:302018-10-14T20:33:27+5:30

कुटुंब आमडदे, ता.भडगाव येथे कुलदेवतेच्या दर्शनाला गेले असताना मयुर सुनील भंगाळे (वय २४, रा.सरसस्वती नगर, मुळ रा. कानळदा) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला बेडशीड बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी साडे चार वाजता सरस्वती नगरात उघडकीस आली.

Child's suicide in the home of the family in Jalgaon | जळगावातील कुटूंब कुलदेवतेच्या दर्शनाला अन् घरात मुलाची आत्महत्या

जळगावातील कुटूंब कुलदेवतेच्या दर्शनाला अन् घरात मुलाची आत्महत्या

Next
ठळक मुद्दे सरस्वती नगरातील घटना मुंबई येथे रेल्वेत नोकरीला आहे तरुण दोन दिवसापूर्वीच आला घरी

जळगाव : कुटुंब आमडदे, ता.भडगाव येथे कुलदेवतेच्या दर्शनाला गेले असताना मयुर सुनील भंगाळे (वय २४, रा.सरसस्वती नगर, मुळ रा. कानळदा) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला बेडशीड बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी साडे चार वाजता सरस्वती नगरात उघडकीस आली. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सरस्वती नगरातील सुनील हरी भंगाळे हे पत्नी, मोठा मुलगा तेजस व सून यांच्यासह रविवारी आमडदे येथे कुलदेवतेच्या दर्शनाला गेले होते. सकाळी १०.३० वाजता ते घरातून बाहेर पडले. लहान मुलगा मयुर हा एकटाच घरी होता. दुपारी साडे चार वाजता संपूर्ण कुटुंब घरी आले असता त्यांना पहिल्याच खोलीत मयुर हा पंख्याला लटकलेला दिसला. बेडशीटने त्याने गळफास घेतला होता. हा प्रकार पाहताच कुटुंबाना धक्का बसला. त्यांनी तातडीने मयुर याला जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. मयुर हा दोन वर्षापूर्वी मध्य रेल्वेत खलाशी म्हणून भरती झाला होता. परेल, मुंबई येथे त्याची ड्युटी होती. दर शनिवारी तो व  सोबतचे मित्र घरी येत होते. 

संशयास्पद वस्तू किंवा चिठ्ठी नाही
दरम्यान, शनी पेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, सहायक उपनिरीक्षक करीम शेख व गिरीश पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत मयुरच्या खिशात चिठ्ठी किंवा संशयास्पद कोणतीच वस्तू आढळून आली नाही.सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्रीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी जिल्हा रुग्णालयात मित्र व नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली होती.

Web Title: Child's suicide in the home of the family in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.