मिरची गोदामाला मध्यरात्री आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:38 AM2020-05-27T11:38:23+5:302020-05-27T11:38:45+5:30
जळगाव : एमआयडीसीतील जी. ५ सेक्टरमधील लोटस अॅग्रो इंडस्ट्रीजच्या गुणिना स्पाइसेस या मिरची मसाला प्रक्रीया उद्योग कारखान्याला मंगळवारी रात्री ...
जळगाव : एमआयडीसीतील जी. ५ सेक्टरमधील लोटस अॅग्रो इंडस्ट्रीजच्या गुणिना स्पाइसेस या मिरची मसाला प्रक्रीया उद्योग कारखान्याला मंगळवारी रात्री ११.४५ वाजता अचानक आग लागली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉर्ट सर्कीटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिरची व हळद प्रक्रिया करणाऱ्या एका बाजूच्या गोदामातील साठा जळून खाक झाला आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, निंबाळकर यांच्यासह आजुबाजूच्या लोकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्याशिवाय मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. प्रशांत समदानी यांच्या मालकीचा हा कारखाना असल्याचे सांगण्यात आले. एमआयडीसी व शहरातून अग्निशमन दलाचे बंब मागविण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरु होते.