मिरचीचे दर एकदमच गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:20 AM2021-08-28T04:20:30+5:302021-08-28T04:20:30+5:30

मुक्ताईनगर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली खरी परंतु भाव एकदम घसरल्याने या मिरची उत्पादक ...

Chili prices plummeted | मिरचीचे दर एकदमच गडगडले

मिरचीचे दर एकदमच गडगडले

googlenewsNext

मुक्ताईनगर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली खरी परंतु भाव एकदम घसरल्याने या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना खूपच नुकसान पोहोचल्याची स्थिती आहे.

सुरुवातीला चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या मिरचीचे दर गडगडल्याने सध्या बाजारात केवळ सातशे ते आठशे रुपये भाव मिळत असल्याने या भावात शेतकऱ्यांच्या तोडणीचा खर्चही भागत नसल्याची स्थिती आहे.

तालुक्यात पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली होती. गेल्या काळात मिरची पिकाने शेतकऱ्यांना तारले होते. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो म्हणून मे महिन्यात अनेकांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून मिरची लागवड केली आहे तर काही शेतकऱ्यांनी जून महिन्यात पाऊस पडल्यावर मिरची लागवड केली होती; परंतु सध्याच्या स्थितीला औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील घाटावरील भागात मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले आणि तिकडे मिरचीचे दर पडल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बाजारात दररोज कमालीचे दर पडत आहेत. परिणामी केलेला खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झालाय. प्रारंभी ५ ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल पोहोचलेले दर पंधरवड्यात ७०० ते ९०० रुपयांपर्यंत गडगडले आहेत.

मिरची रोप लागवडीपासून ते तोडणीपर्यंत शेतकऱ्याला २० ते २२ रुपये प्रतिकिलोपर्यंत अंदाजित खर्च येतो. यात तोडणी मजूर मिळत नाही आणि मिळालेच तर सध्या एक किलो मिरची तोडण्यासाठी सहा रुपये मजुरी खर्च येतो. बाजारात मिरचीला ७ ते ९ रुपये किलो भाव आहे. फक्त तोडणी आणि वाहतूक खर्चापुरताच इतका भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कुऱ्हा बाजारात काल १० रुपये किलो हिरवी मिरची मिळत होती. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी २० रुपये किलो उत्पादन खर्च लागतो अशात मिरचीची शेतीतून उत्पादन खर्च ही निघणे कठीण झाले आहे.

- अनिल पाटील, मिरची उत्पादक शेतकरी पारंबी, ता. मुक्ताईनगर

Web Title: Chili prices plummeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.