पावसाळी काव्यधारांनी रसिक झाले चिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:44 PM2019-08-07T23:44:46+5:302019-08-07T23:45:23+5:30
चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ...
चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पावसाळी कविता वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात एकूण २५ नवकवींनी सहभाग नोंदवीत रसिकांना काव्यधारांनी चिंब केले.
स्पर्धेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सुगरण पाटील (पाऊस), कविता बोरसे, पौर्णिमा नेवे, भाग्यश्री पाटील, आकाश अहिरे, अश्विनी पाटील, ऋतिक कुंभार, महाजन अश्विनी, प्रमोद पाटील, विशाल सपकाळे, रविना पाटील, ममता धोबी, मोहिनी खैरनार, राहुल निकुंभ, गौरी चौधरी, पाटील भाग्यश्री, भिल्ल अजय, प्रवीण कहाण, खैरनार योगेश या विद्यार्थ्यांनी स्वलिखित तर काहींनी पावसावरील प्रसिद्ध कवितांचे सादरीकरण केले. यावेळी प्रा.कल्याणी राजपूत यांनीही पावसाळी कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
स्पर्धेत विशाल सपकाळे, प्रवीण कहाणे अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले. तर पाटील प्रमोद व निकुंभ राहुल यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
यावेळी संदीप भास्कर पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ते म्हणाले की, कवितेतील शब्दांना न्याय देणारे सादरीकरण विद्यार्थ्यांनी करावे, असे सांगून त्यांनी स्पर्धकांचे कौतुक केले.
अध्यक्षीय मनोगत डॉ.के.एन.सोनवणे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचलन कवी प्रा.मधुचंद्र एल.भुसारे यांनी केल, तर आभार प्रा.विद्या सोनवणे यांनी मानले. रजिस्ट्रार डी.एम.पाटील, प्रा.माया शिंदे, प्रदीप पाटील, प्रा.अनिल सूर्यवंशी, डॉ.हरीश चौधरी, प्रा.सुनीता पाटील आदी उपस्थित होते. प्रा.गोपाल बडगुजर, प्रदीप बाविस्कर, हनुमंत पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.