आंतरराष्ट्रीय मंचावर दहशतवादासाठी चीनचे पाकिस्तानला सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 06:43 PM2017-08-14T18:43:05+5:302017-08-14T18:45:04+5:30

जामनेर येथे स्वदेशी मंचचे दिल्ली येथील प्रचारक सतीशकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

China's cooperation with Pakistan for terrorism on international stage | आंतरराष्ट्रीय मंचावर दहशतवादासाठी चीनचे पाकिस्तानला सहकार्य

आंतरराष्ट्रीय मंचावर दहशतवादासाठी चीनचे पाकिस्तानला सहकार्य

Next
ठळक मुद्देचीनकडून भारतात 61.8 बिलीयन डॉलरची आयात आपल्या देशाला दरवर्षी 3542 अरब रुपयांचा तोटा

ऑनलाईन लोकमत जामनेर (जि. जळगाव), दि. 14 : पाकिस्तानचा दहशतवाद पसरविण्यासाठी चीन आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांना प्रत्येक ठिकाणी सहकार्य करीत आहे. यासाठी नागरिकांनी चिनी मालावर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे, अशी माहिती स्वदेशी जागरण मंचचे दिल्ली येथील प्रचारक सतीशकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. चीनकडून भारतात 61.8 बिलीयन डॉलरची आयात होते. यामुळे आपल्या देशाला दरवर्षी 3542 अरब रुपयांचा तोटा होतो. याचा गांभीर्याने विचार करून चिनी मालावर सर्वानीच बहिष्कार टाकावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. बाबाजी राघो मंगल कार्यालयात झालेल्या या पत्रपरिषदेला राजीव क्षीरसागर, ज्ञानेश्वर चौधरी, नीलेश गजरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: China's cooperation with Pakistan for terrorism on international stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.