चिनावलच्या शेतकऱ्याची केळीची ८०० खोडे समाजकंटकांनी कापून फेकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 05:24 PM2019-09-25T17:24:26+5:302019-09-25T17:27:11+5:30
वडगाव शिवारातील शेतात समाजकंटकांनी रोपांची सुमारे ८०० खोडे कापून फेकून दिलेली आहेत.
चिनावल, ता.रावेर, जि.जळगाव : येथील शेतकरी गोपाळ देवचंद पाटील यांच्या वडगाव शिवारातील शेतात समाजकंटकांनी टिश्यू केळी रोपांची सुमारे ८०० खोडे कापून फेकून दिलेली आहेत. या प्रकाराने चिनावल, वडगाव, विवरा, वाघोदा परिसरातील शेतकºयांमध्ये घबराट पसरली आहे.
वडगाव पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन गोपाळ देवचंद पाटील यांची वडगाव गावानजीक केळी बाग आहे. नुकसान केल्याच्या या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वडगावातून शेतकºयांचे केळी घड चोरून रेल्वेद्वारे मुंबईला घेऊन जातात.
दरम्यान, या प्रकाराने नुकसानग्रस्त शेतकरी गोपाळ पाटील यांनी निभोरा पोलिसात फिर्याद दिली. त्यात संशयिताचे नाव देवी असल्याचे म्हटले आहे. सपोनि. जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ.मंडलिक, बाळू पाटील करीत आहेत.