शिरागड येथून साकळी येथे आणली अखंड ज्योत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 05:47 PM2019-09-29T17:47:58+5:302019-09-29T18:02:48+5:30
शिरागड येथील सप्तशृंगी मातेच्या गडावरून रविवारी साकळी येथे अखंड ज्योत आणण्यात आली.
चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : शिरागड येथील सप्तशृंगी मातेच्या गडावरून रविवारी साकळी येथे अखंड ज्योत आणण्यात आली.
साकळी येथील मुजुमदार कॉलनीतील अष्टभूजा मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी शिरागड येथील जगत जननी सप्तशृृंंगी मातेच्या गडावरुन पायी अखंड ज्योत आणली जाते. या मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रीसाठी अखंड ज्योत आणण्याचा उपक्रम पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या मंडळातील सर्व पदाधिकारी व महिला भक्त जवळपास १५ किलोमीटर पायी जाऊन शिरागड येथून वाजत गाजत व दुर्गा मातेच्या जयघोषात अखंड ज्योत आणत असतात. या अखंड ज्योत मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष दिनेश माळी, योगेश तेली, मनोज शिरसाळे, किसन माळी, गणेश माळी, प्रशांत माळी, गोलू तेली, मंदार बडगुजर, जितू वाघळे, संजय माळी, महेंद्र तेली, चेतन तेली, जयेश माळी, अक्षय धोबी, मयूर चौधरी, किरण चौधरी, किसन ओतारी, किसन भोई, गोपाळ तेली, गोपाळ चौधरी, भय्या तेली, तसेच माळी महासंघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संध्या गणेश माळी, सुरेखा खेवलकर, शोभा माळी, अलका माळी, शीतल शिरसाळे यांच्यासह इतर महिला व पुरुष भाविक- भक्त सहभागी झाले होते.