दहा वर्षानंतरच प्रथमच मिरचीचा ‘ठसका’

By admin | Published: March 29, 2017 06:36 PM2017-03-29T18:36:13+5:302017-03-29T18:36:13+5:30

तब्बल दहा वर्षानंतर यंदा मिरचीची रेकॉर्डब्रेक अर्थात 52 कोटींची उलाढाल झाली आहे. तब्बल अडीच लाख क्विंटल मिरची यंदा खरेदी करण्यात आली.

Chirchi's 'Chaska' for the first time after 10 years | दहा वर्षानंतरच प्रथमच मिरचीचा ‘ठसका’

दहा वर्षानंतरच प्रथमच मिरचीचा ‘ठसका’

Next

52 कोटींची झाली उलाढाल : यंदा रेकॉर्डब्रेक अडीच लाख क्विंटल आवक

मनोज शेलार 
नंदुरबार, दि.29 : तब्बल दहा वर्षानंतर यंदा मिरचीची रेकॉर्डब्रेक अर्थात 52 कोटींची उलाढाल झाली आहे. तब्बल अडीच लाख क्विंटल मिरची यंदा खरेदी करण्यात आली. मिरची हंगाम जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. पुढील वर्षी मात्र, मिरची पथारींना जागेची अडचण सतावणार असल्यामुळे उलाढालीवर परिणामाची भिती आतापासूनच व्यक्त होऊ लागली आहे.
मिरचीचे आगार म्हणून ओळखल्या जाणा:या नंदुरबारात गेल्या दहा वर्षात मिरची मार्केट पुर्णत: कोलमडले होते. त्याला विविध कारणे होती. एकतर मिरचीवर येणा:या विविध रोगांमुळे लागवड कमी झाली. मिरचीचे क्षेत्र इतर नगदी पिकांनी व्यापले. भाव मिळत नसल्यामुळे शेतक:यांनी मिरची लागवडीकडे केलेले दुर्लक्ष यासह इतर कारणांचा समावेश होता. त्यामुळे कधीकाळी अडीच ते तीन लाख क्विंटल खरेदी-विक्री होणा:या येथील बाजार समितीत 70 हजार ते एक लाख क्विंटल दरम्यान मिरची उलाढालीवर समाधान मानावे लागत होते. यंदा मात्र गेल्या दहा वर्षाची भर निघाली आहे.
हंगामाच्या सुरुवातीपासूनच..
यंदा अगदी हंगामाच्या सुरुवातीपासूनच मिरचीची आवक वाढली होती. खरीप हंगामात ब:यापैकी झालेला पाऊस, मिरची पिकासाठी असलेले पोषक वातावरण आणि वाढलेले क्षेत्र यामुळे ऑक्टोबर महिन्यापासूनच हिरवी मिरची बाजारात दाखल झाली होती. दैनंदिन तब्बल सातशे क्विंटल हिरवी मिरचीची आवक झाली होती. भाव देखील अवघा सहाशे ते सातशे रुपये क्विंटल होता. त्यामुळे हिरवी मिरची देखील व्यापा:यांनी मोठय़ा प्रमाणावर खरेदी केली होती. पहिल्यांदाच हिरव्या मिरचीच्या पथारी देखील पहावयास मिळाल्या होत्या. 
दहा वर्षानंतर..
चालू वर्षी मिरचीची आवक ही दहा वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे बाजार समितीने सांगितले. 2007-08 च्या हंगामानंतर यंदाच मिरचीने अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार केला आहे. आणखी किमान 20 ते 25 हजार क्विंटल आवक गृहित धरली तर यंदा पावणे तीन लाख क्विंटलपेक्षा अधीक आवक नोंदली जाणार आहे.
50 कोटी पार
उलाढालीचा आकडा देखील 50 कोटी पार करून गेला आहे. आतार्पयत तब्बल 52 कोटींची उलाढाल झाली आहे. आणखी उलाढाल होण्याची शक्यता आहेच. गेल्या वर्षाचा विचार करता गेल्या वर्षी अवघी 90 हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती. त्यातून 27 कोटींची उलाढाल झाली होती. यंदा तिप्पट आवक व उलाढाल झाली आहे.
प्रक्रिया उद्योग
नंदुरबारात 10 नामांकित उद्योग असून इतर लहान-मोठय़ा उद्योगांची संख्या 20 च्या घरात आहेत. येथील नामांकित ब्रॅण्ड देशभरात प्रसिद्ध आहेत. पाच वर्षापूर्वी येथील मिरची आखाती देशातदेखील निर्यात करण्यात आली होती. मात्र, शासकीय अनास्था, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, बाजारतंत्र मिळविण्यात उद्योजकांची उदासीनता यामुळे येथील मिरची उद्योग काहीसा मागे पडला आहे. येथील उद्योजक वर्षभराचा साठा करून ठेवतात. येथे असलेल्या शीतकेंद्रांमध्ये ती मिरची साठविली जाते. प्रक्रिया उद्योगासाठी जेवढी लागेल तेवढी मिरची त्यातून काढली जाते. येथे  असलेल्या बहुतेक मिरची पथारी ह्या प्रक्रिया उद्योजकांच्याच आहेत. अशा ठिकाणी मिरची कोरडी करून ती शीतकेंद्रात साठविण्यासाठी ठेवली जात असते. 
मध्य प्रदेशची मिरची
यंदा बाजार समितीत नेहमीप्रमाणे मध्य प्रदेशची मिरचीदेखील दाखल झाली. अर्थात त्या भागातून ओली मिरचीची आवक कमी राहिली. परंतु कोरडी मिरचीची आवक ब:यापैकी झाली. वर्गवारीनुसार या मिरचीला साडेसहा ते साडेदहा हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. आता या मिरचीची आवकदेखील वातावरणातील बदलामुळे कमी झाली आहे. ठोक खरेदीदार तसेच मिरची प्रक्रिया उद्योग व्यावसायिक या मिरचीला पसंती देत असत. परंतू यंदा स्थानिक स्तरावरच मोठय़ा प्रमाणावर मिरची खरेदी केली गेली.
नोटा बंदीचाही फटका
मिरचीची उलाढाल आणखी एक ते दोन कोटींनी वाढली असती. परंतु नोटा बंदीच्या काळात मिरचीची उलाढाल पुर्णपणे ठप्प झाली होती. व्यापा:यांनी चलन टंचाईमुळे खरेदी बंद ठेवली होती. त्यामुळे शेतक:यांना स्वत:च शेत शिवारात ओली मिरची सुकवावी लागली होती. मिरची सुकविण्याचे तंत्र शेतक:यांना अवगत नसल्यामुळे व पुरेशी जागा नसल्यामुळे मिरचीची गुणवत्ता खराब राहिली. त्याचा फटका अर्थातच भाव मिळण्यात झाला. डिसेंबरपासून मात्र नियमित व्यवहार झाल्याने पुन्हा उलाढाल पूर्वपदावर आली होती.
सध्या मार्केट बंदच
सद्या मिरची मार्केट बंद आहे. मार्च अखेरमुळे व्यापा:यांना लेखा-जोखा सादर करणे, चलनासंदर्भातील समस्या आणि इतर कारणांमुळे व्यापा:यांनी दोन दिवसांपासून मिरची खरेदीबंद ठेवली आहे. आता 1 एप्रिलनंतरच मिरचीची खरेदी-विक्री सुरू होणार आहे. आणखी किमान 20 ते 25 हजार क्विंटल मिरची आवक होण्याचा अंदाज बाजार समितीला आहे. 

Web Title: Chirchi's 'Chaska' for the first time after 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.