जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर करणार चित्ररथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 09:37 PM2020-10-19T21:37:24+5:302020-10-19T21:37:35+5:30

जिल्हाधिकार्‍यांच्याहस्ते हिरवी झेंडी : गावगावी पथनाट्य

Chitrarath will raise awareness about cleanliness in the district | जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर करणार चित्ररथ

जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर करणार चित्ररथ

Next

जळगाव : जागतिक हात धुवा दिवसानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हावासियांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी याकरीता तयार करण्यात आलेल्या ह्यजागर स्वच्छतेचाह्ण चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकरी राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे आदी उपस्थित होते.
जागतिक हात धुवा अभियानानिमित्ताने युनिसेफ व जिल्हा प्रशासन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हात धुणे, स्वच्छता बाळगणे व कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी याबाबत स्वच्छता रथाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. याकरीता १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत हा चित्ररथ जिल्हाभर जनजागृतीसाठी फिरविण्यात येणार आहे. चित्ररथाद्वारे तसेच विनोद ढगे आणि त्यांचे सहकारी यांच्यावतीने पथनाट्य सादर करुन स्वच्छता राखण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येणार आहे.
स्वच्छता जागर चित्ररथ १९ ऑक्टोबर रोजी शिरसोली, एरंडोल, पिंपळकोठा, धरणगाव, पाळधी बु. याठिकाणी जाऊन जनजागृती करेल. २० ऑक्टोबर रोजी चोपडा, अडावद, अमळनेर, डांगर बु. पारोळा, राजवड येथे, २१ ऑक्टोबर रोजी चाळीसगाव, पातोंडा, कजगाव, भडगाव, पाचोरा, नगरदेवळा येथे, २२ ऑक्टोबर रोजी जामनेर, नेरी, बोदवड, नाडगाव, मुक्ताईनगर, कोथळी येथे तर २३ ऑक्टोबर रोजी रावेर, मोरगाव, यावल, भालोद, भुसावळ, फुलगाव येथे रथाचा समारोप होईल. चित्ररथाचे आपल्या गावात आगमन झाल्यावर नागरिकांनी शारिरीक अंतराचे पालन करुन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व स्वच्छतेचे महत्व जाणून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे यांनी केले आहे.

Web Title: Chitrarath will raise awareness about cleanliness in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.