उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अखेर चॉईस बेस्ड सिस्टीम लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 07:37 PM2018-07-12T19:37:20+5:302018-07-12T19:39:05+5:30

विद्यार्थी व महाविद्यालयांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने यावर्षापासून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू करण्याचा निर्णय अधिष्ठाता व सर्व अभ्यासमंडळ अध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला.

Choice based system finally implemented at North Maharashtra University | उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अखेर चॉईस बेस्ड सिस्टीम लागू

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अखेर चॉईस बेस्ड सिस्टीम लागू

Next
ठळक मुद्देजागतिक स्पर्धेत विद्यार्थी टिकावा यासाठी घेतला सर्वानुमते निर्णयप्राध्यापकांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाहीअधिष्ठाता व अभ्यास मंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

जळगाव : विद्यार्थी व महाविद्यालयांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने यावर्षापासून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू करण्याचा निर्णय अधिष्ठाता व सर्व अभ्यासमंडळ अध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला.
कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार १२ रोजी विद्यापीठात बैठक झाली. यावेळी चॉईस बेस्ड क्रेडीट सिस्टीम अर्थात 'सीबीसीएस' प्रणालीवर सविस्तर चर्चा झाली. शैक्षणिक क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी या स्पर्धेत टिकावा यादृष्टीने जे नवे बदल करता येतील त्या बदलांना सामोरे जाण्याचा सर्व अभ्यासमंडळाच्या अध्यक्षांनी बैठकीत निर्धार व्यक्त केला.
कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी 'सीबीसीएस' प्रणालीचे फायदे सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाप्रमाणे व नवीन विद्यापीठ कायदा लक्षात घेऊन ही प्रणाली या वर्षापासून लागू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रणालीमुळे प्राध्यापकांच्या कार्यभारावर कोणताही परिणाम होणार नाही आणि परिणाम झाल्यास विद्यापीठ हे प्राध्यापकांच्या पाठीशी पुर्णत: उभे राहील. प्रसंगी शासन दरबारी याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही बैठकीत दिली.
'सीबीसीएस' प्रणाली प्रमाणे २०१८/१९ चे सर्व अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सर्वच अभ्यासमंडळांच्या अध्यक्षांनी ही प्रणाली लागू करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नॅक, रूसा आणि एनआयआरएफच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये देखील ही प्रणाली अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात आलेली नसेल, त्या महाविद्यालयांना रूसाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जाणार नसल्याचे यावेळी सांगितले.याचा फायदा विद्यार्थ्यांच्या रोजगार वाढीसाठीच होणार आहे, असे मत या बौठकीत व्यक्त झाले.
प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी या प्रणालीच्या अनुषंगाने तांत्रिक माहिती दिली. व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, अधिष्ठाता प्राचार्य पी.पी.छाजेड, प्राचार्य प्रमोद पवार आणि सर्व अभ्यासमंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते.

Web Title: Choice based system finally implemented at North Maharashtra University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.