चोपडा बस आगार बनले गुरांचा गोठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 09:32 PM2019-09-14T21:32:10+5:302019-09-14T21:32:14+5:30
परिसरात खड्डेच खड्डे । अवैध वाहतुकीचा विळखा
चोपडा : येथील राज्य परिवहन मंडळाचे बस आगार जिल्यात दुस?्या क्रमांकाचे मोठे आगार आहे. येथे प्रवाशांची संख्याही त्याप्रमाणात जास्तच असते. मात्र, काही महिन्यांपासून या बस स्थानकाची दुरवस्था होत चालली आहे. भोवतालच्या अतिक्रमणासोबतच प्रवाशांना बसायच्या जागेवरही गुरांचे प्राबल्य अधिक पाहायला मिळते. या सद्य:स्थितीत बदल होणे अपेक्षित आहे.
जिथे प्रवासी बसायची व्यवस्थो तिथेच मोकाट गुरे बसलेली असतात. स्थानकावर सकाळी सर्वत्र शेण पसरलेले दिसते. त्यामुळे जागा असतानाही बसावे कोठे याची मोठी पंचाईत होते. अशा अनेक समस्यांच्या विळख्यात असलेले आगार लाखोंच्या तोट्यात आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बस स्टँड आणि वर्कशॉपकडे जाणा?्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून त्यात पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य आहे. दोन्ही गेटजवळ रस्ता खूपच खराब असल्याने व खड्ड्यांत घाण पाणी साचल्याने ते प्रवाशांच्या अंगावर उडते. बस स्थानक आवारात पाटील गढी कडे जाणा?्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. स्थानकातील शौचालयाचे घाण पाणी यातून जाते. त्यामुळे या पाण्याची दुगंर्धी परिसरात पसरते. अनेकवेळाया खड्ड्यात दुचाकी व चारचाकी वाहने पडल्याने अपघात झाले आहेत. या खड्ड्यातून जाणारा घाण पाण्याचा पाईप दुरुस्त करून तत्काळ खड्डा बुजविणे गरजेचे आहे.
नियमांची पायमल्ली
आगाराला लागूनच अवैध प्रवासी वाहतूक खासगी वाहनांतून मोठ्या प्रमाणावर चालते. वास्तविक बस स्थानकाच्या २०० मीटरच्या आवारात अवैध प्रवासी वाहतूक होऊ नये असा नियम आहे. त्याची पायमल्ली करीत बसस्थानकात घुसून अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. रस्त्याचे तीन तेरा
आगाराच्या आवारातील रस्त्याचे डांबरीकरण जागोजागी उखडून खड्डे पडलेले आहेत. या भागातून अवैध मागार्ने वाहने, मोटारसायकली, भाजीपाला, फळविक्रेत्यांचे गाडे, अन्य व्यावसायिकांचे गाडे, तसेच गुरांचा वावर येथेच असल्याने अनेक वेळा चालकाला मोठ्या कसरतीतून जावे लागते.
या सर्व बाबींकडे आगार प्रमुखांना लक्ष देण्याची तसेच तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.