चोपडय़ात श्री विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 06:06 PM2017-08-29T18:06:37+5:302017-08-29T18:20:09+5:30

चोपडा शहरातील 5 सार्वजनिक गणेश मंडळांनी केले गणरायाचे विसर्जन

In Chopda, the beginning of the varnishing procession of Mr. Visarjan | चोपडय़ात श्री विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

चोपडय़ात श्री विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Next
ठळक मुद्देश्री विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांवर गुलाल ऐवजी पुष्पवृष्टीमिरवणुकी दरम्यान पावसाचे आगमन झाल्याने भक्तांमध्ये संचारला उत्साहचोपडय़ात 52 पैकी पाच गणेश मंडळांनी केले दुपार्पयत श्रीचे विसर्जन

ऑनलाईन लोकमत 
चोपडा, दि.29 - गणपती  बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या..असा जयघोष करीत येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीला मंगळवारी सकाळी 8 वाजेपासून सुरवात झाली. दुपारी 3 वाजेर्पयत 52 पैकी पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींचे तापी नदीपात्रात विसर्जन झाले होते. 
चोपडा येथे पाचव्या दिवशी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन होत असते. मंगळवारी सकाळी 9 वाजेपासून विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. गोलमंदिरापासून विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. या मिरवणुकीत विवेकानंद विद्यालयातील 9 वी व 10 वीच्या विद्यार्थीनींनी लेझीमचे सादरीकरण करून सर्वाचेच लक्ष वेधून घेतले.

अनेक मंडळांनी ढोल-ताशे लावले होते. विसर्जन मिरवणूक शहरातील विविध मार्गावरून शिवाजी चौकाकडे येत होती. तेथून गणेश मंडळे आपल्या श्रींची मूर्ती तापी नदीवर विसर्जनासाठी घेऊन जात होते. सर्वात प्रथम तहसील कार्यालय परिसर चौकातील राणी लक्ष्मीबाई गणेश मित्र मंडळाचा गणपती विसर्जन झाले. गुलालाऐवजी मंडळाच्या कार्यकत्र्यांवर नागरिक फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करीत होते. विसर्जन मिरवणूक सुरू असतांनाच पावसाचा शिडकावा सुरू झाला. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंद संचारला होता.

Web Title: In Chopda, the beginning of the varnishing procession of Mr. Visarjan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.