चोपडा नगराध्यक्षा,नगरसेवकांसह २० जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:00 PM2018-09-13T22:00:46+5:302018-09-13T22:02:20+5:30

नगरपालिकेवर पाणीटंचाईसह विविध समस्यांच्या संदर्भात तक्रार करण्यास गेलेल्या महिलांना नगराध्यक्षा व त्यांचे पती तसेच अन्य २० जणांवर विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chopda city police, 20 people including corporators | चोपडा नगराध्यक्षा,नगरसेवकांसह २० जणांवर गुन्हा

चोपडा नगराध्यक्षा,नगरसेवकांसह २० जणांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देविनयभंग व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखलपिण्याच्या पाण्याची समस्या घेवून गेले होते नगरपालिकेतपीडित महिलेचा हात पकडून केला होता विनयभंग

चोपडा : येथील नगरपालिकेवर पाणीटंचाईसह विविध समस्यांच्या संदर्भात तक्रार करण्यास गेलेल्या महिलांना नगराध्यक्षा व त्यांचे पती तसेच अन्य २० जणांवर विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त वृत्त असे की, ६ रोजी सकाळी १० वाजता मल्हारपुरा भागातील ५० ते ६० महिला व पुरुष पिण्याच्या पाण्याची समस्या घेऊन चोपडा नगरपरिषदेत नगराध्यक्षांच्या दालनात गेले असता तेथे समस्या मांडत असतांना जीवन चौधरी यांनी पीडित महिलेचा हात पकडून विनयभंग केला. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला पीडितेच्या फियार्दीवरून नगराध्यक्षा मनीषा जीवन चौधरी, राष्ट्रवादीचे गटनेते जीवन चौधरी, रमेश एकनाथ चौधरी सर्व राहणार चोपडा व अन्य २० जणांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायदा व भादवी ३५४, ३५४ (अ), २९४, १४३, १४७, १४९, ३२३,५०४, ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार चव्हाण हे करीत आहेत.

Web Title: Chopda city police, 20 people including corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.