चोपड्यातील डॉक्टरला विनयभंगप्रकरणी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:59+5:302021-05-30T04:14:59+5:30

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉक्टरकडे काझी मोहल्ला भागातील विवाहिता आपल्या तीन वर्षाच्या मुलाचा दात-दाढदुखीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी ...

Chopda doctor arrested for molestation | चोपड्यातील डॉक्टरला विनयभंगप्रकरणी अटक

चोपड्यातील डॉक्टरला विनयभंगप्रकरणी अटक

Next

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉक्टरकडे काझी मोहल्ला भागातील विवाहिता आपल्या तीन वर्षाच्या मुलाचा दात-दाढदुखीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी घेऊन गेली असता, डॉ. आबिद शेख याने दरवाजा बंद करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना शहरात घडली आहे. मुलाचा दात दाढ तपासणी करताना डॉक्टरने महिलेच्या अंगास हात लावला. महिलेस लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. त्यावेळी महिलेने डॉक्टरचा हात झुगारून दरवाजाबाहेर जाऊन आरडाओरड केली. आजूबाजूचे नागरिक जमले. महिलेच्या कुटुंबातील सदस्यही तिथे पोहचले. महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरला जबर चोप दिला व चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

डॉक्टरलाही जबर मारहाण केली असता, त्यानेही मारहाणीचा महिलेच्या दोन नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याने तिकडीलही दोन जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांचीही जामिनावर सुटका झाली असल्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी सांगितले. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.

Web Title: Chopda doctor arrested for molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.