चोपडय़ातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाचे ‘लोकनाटय़’ पोहचले राष्ट्रीय पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 07:32 PM2017-12-01T19:32:19+5:302017-12-01T19:36:53+5:30
पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत ‘ सरकार ! द्या उत्तर’ हे लोकनाटय़ कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाने सादर केले होते, त्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून त्याची भोपाळ येथे जानेवारीत होणा:या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
ऑनलाईन लोकमत चोपडा, दि.1 : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान भारत सरकार व शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कला महोत्सवातंर्गत 27 नोव्हेंबर रोजी कोथरूड (पुणे) येथे झालेल्या राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत ‘लोकनाटय़’ या कला प्रकारात चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाने ‘प्रथम क्रमांक’ मिळविला आहे. या यशामुळे विद्यालयाच्या संघाची भोपाळ येथे होणा:या राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे . हा संघ राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे . माध्यमिक स्तरावरील विद्याथ्र्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यातील कला गुणांना वाव देण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या मार्फत 2015-16 पासून कला उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यात लोकसंगीत, लोकनृत्य, लोकनाट्य (अभिनय), दृश्यकला या कला प्रकारांचा समावेश करण्यात येतो. यात जिल्हास्तरावरून निवड झालेला एक संघ विभागाचे प्रतिनिधित्व करतो विभागीय पातळीवरून, राज्य पातळीवर, तेथून राष्ट्रीय पातळीवर संघ स्पर्धेत सहभागी होतात ‘लोकनाट्य या प्रकारात विद्यालयाने ‘‘ सरकार ! द्या उत्तर ’’ या विषयावर ग्रामीण भागातील विजेची समस्या, न्यायालयाकडून उशिराने मिळणारा न्याय, शेतकरी आत्महत्या, शहीद जवानाच्या प}ीची होणारी फरफट, धर्माधर्मात होणारे वाद, हॉकी प्लेयरची व्यथा, ह्या विषयांवर सरकार पुढे प्रश्न मांडून. द्या उत्तर.. असा सवाल करीत नाटिका सादर केली. या लोकनाटय़ात सपना साळुंखे, प्रतीक्षा धनगर, स्मृती भोई, वर्षा कोळी, महेश पाटील, जयेश महाजन, प्रवीण पाटील, रोहित सूर्यवंशी, लोकेश चौधरी, ऋषिकेश पाटील,या विद्याथ्र्यांनी विविध भूमिका सादर केल्यात. ह्या विजयी स्पर्धकांचे संस्थेच्या पदाधिका:यांनी अभिनंदन केले आहे. यांनी केले मार्गदर्शन कोथरूडला पार पडलेल्या राज्यस्तरीय कला उत्सवात कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाने नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करून राज्यातून प्रथम क्रमांक मिळविला. संघास राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक डॉ. सुवर्णा खरात, लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे, लोकशाहीर नंदेश उमप यांनी मार्गदर्शन केले.