चोपडा, पारोळ्यात संसर्ग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:49 AM2021-01-08T04:49:59+5:302021-01-08T04:49:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील चोपडा आणि पारोळा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून चोपड्यात १५ तर पारोळ्यात १३ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील चोपडा आणि पारोळा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून चोपड्यात १५ तर पारोळ्यात १३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यासह जिल्ह्यात एकत्रित ५९ नव्या बाधितांची नोंद झाली आहे.
चाळीसगाव येथील ५८ वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या १३३४ वर पोहोचली आहे. गुरूवारी ११३६ अहवाल समोर आले. त्यात ५९ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, सलग सातव्या दिवशी सर्वाधिक १६ रुग्ण समोर आले आहेत. त्यात १६ रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहे. सक्रीय रुग्णांची संख्या २२६ झाली आहे.
चाचण्या ४ लाखांवर
जिल्ह्यातील कोरोनाचा चाचण्यांची संख्या ४ लाख १ हजार ३४४ झालेली आहे. यात २५६७३३ ॲन्टीजन तर १४४६११ आरटीपीसीआर चाचण्या झालेल्या आहेत. यात एकूण ५६१८३ रुग्ण बाधित आढळून आले असून हे प्रमाण १३ टक्के झाले आहे. मध्यंतरी एकत्रित चाचण्यांमध्ये बाधितांचे प्रमाण हे २२ टक्क्यांवर पोहोचले होते.