चोपड्यातील जवानाला त्रिपुरा येथे दहशतवाद्यांचा सामना करताना हौतात्म्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 00:26 IST2024-09-10T00:23:43+5:302024-09-10T00:26:02+5:30
बडगुजर हे गेल्या २० वर्षांपासून १०५ बीएसएफ बटालियन (सी टी /जीडी )मध्ये कार्यरत होते. ते चार महिन्यांनी निवृत्त होणार होते.

चोपड्यातील जवानाला त्रिपुरा येथे दहशतवाद्यांचा सामना करताना हौतात्म्य
चोपडा (जि. जळगाव) : बीएसएफमध्ये कार्यरत चोपडा येथील जवान अरुण दिलीप बडगुजर ( ४२, रा. साई बाबा कॉलनी) यांना त्रिपुरा येथे अतिरेक्यांशी लढतांना हौतात्म्य आले. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
बडगुजर हे गेल्या २० वर्षांपासून १०५ बीएसएफ बटालियन (सी टी /जीडी )मध्ये कार्यरत होते. ते चार महिन्यांनी निवृत्त होणार होते. सोमवारी दुपारच्या सुमारास भारत -बांगलादेश सीमेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले, अशी माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली.
यासंदर्भात सायंकाळी अरुण बडगुजर यांच्या घरी निरोप आला आणि कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.