चोपडा, भडगाव तालुक्यात पिकांचे कोट्यवधीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 08:45 PM2019-04-15T20:45:00+5:302019-04-15T20:45:06+5:30
अवकाळी वादळी पावसाने हानी : शेतकरी अडचणीत, भरपाई मिळण्याची मागणी
चोपडा/ भडगाव : रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने चोपडा तालुक्यात प्रचंड नुकसान झाले असून त्या खालोखाल भडगाव तालुक्यातला फटका बसला आहे. चोपडा तालुक्यात केळीचे अधिक नुकसान झाले असून सुमारे ८ ते १० आदिवासींच्या घरांचे छप्पर उडाल्याने त्यांचा संसार उघड्यार आला आहे. तर भडगाव तालुक्यात केळी, आंबा व लिंबू यांना फटका बसला आहे. ऐन दुष्काळात कोट्यवधीचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
चोपडा तालुक्यात
केळीचे मोठे नुकसान
चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये रविवारी १४ रोजी दुपारी सुमारे एक तास जोरदार वादळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यात केळी पीक आडवे होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळाचे केंद्रबिंदू यावेळी चहार्डी असल्याने मोठा फटका चहार्डी भागात बसला आहे. लासुर,आडगाव आणि बिडगाव,शेवरे या गावांमध्ये अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला. वादळामुळे एकूण २९० शेतकरी बाधीत झाल्याचीमाहिती तहसीलदार अनिल गावित व नायब तसहीलदार अधिकार पेंढारकर यांनी दिली. वादळात वाऱ्याचा वेग प्रतितास १३ ते ३७ किलोमीटर असल्याने या वादळात अनेक केळी बागा आडव्या झाल्या आहेत. तर काही ठिकाणी विजेचे खांब व वृक्षही कोसळले. शेवरे येथे अनेक घरांवरील छप्परही उडून गेल्याने अनेकांचा संसार उघड्यावर आला. तसेच शेतशिवारातील जेमतेम असलेला गुरांसाठीचा मका व गव्हाचा चाराही खराब झाला. काही ठिकाणी वृक्षही उन्मळले.
वादळ अकुलखेडा मार्गे चहार्डीकडे आले. त्यात चहार्डी परिसरात असलेली केळी आडवी झाली. तसेच इतर पिके गहू,दादर,कांदा, मका यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.चहार्डी येथे मिलिंद भास्करराव शहा यांच्या शेतातील जवळपास ४०० केळीचे झाडे आडवे झाले त्यांचे जवळपास ६० हजार रुपयांचे नुकसान झाले,तर सुहालाल शिवाजी पाटील यांच्या शेतातील केळीचे १००० केळीचे झाडे आडवी झाले त्यात त्यांचे जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले.
डॉ. संजीव शामराव पाटील यांच्या शेतातील २०० केळीचे झाडे तर जी. टी. पाटील यांच्या शेतातील २०० केळीचे झाडे आणि बंडू चौधरी यांच्या शेतातील १०० केळीचे झाडे व प्रशांत जगन्नाथ पाटील यांच्या शेतातील १५० केळीचे झाडे उन्मळून पडल्याने प्रत्येकी हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. अडावद परिसरातही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
बिडगाव परिसरात
१६ तास ‘बत्ती गुल’
सातपुडा पर्वतातील कुड्यापाणी, शेवर,े बिडगाव, वरगव्हान परिसरात १४ रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान वादळी वाºयासह जोरदार पावसाने अनेक शेतकºयांची केळीची झाडे जमीनदोस्त होवून नुकसान झाले. वृक्षही उन्मळ होते.तर विजेचे खांब कोसळुन सुमारे १५गावांचा बंद पडलेला विजपुरवठा तब्बल सोळा तासांनी पुर्ववत झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन पाण्यासाठी चांगलीच भटकंती झाली.
बिडगाव येथील दशरथ पाटील, प्रताप पाटील भालोदकर यांचे तर वरगव्हान येथील पोलीस पाटील गोरख पाटील, हुकूमचंद पाटील आदी शेतकºयांची केळी जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे. तर शेवरे येथे वादळात सुभान पावरा यांच्यासह सात ते आठ नागरिकांच्या घरांचे छते उडून नुकसान झाले होते. ते दुरूस्तीचे काम हे बाधीत ग्रामस्थ करीत होते.
दिवसभर ढगाळ वातावरण
दरम्यान १५ रोजी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली आहे.तापमान खाली आहे. तसेच चोपडा शहरासह अनेक भागात वादळात तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. दुपारी एक वाजेनंतर वीज पुरवठा सुरळीत झाला.
भडगाव तालुक्यात
आंबा, लिंबू बागांना फटका
भडगाव- शहरासह तालुक्यात १४ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अवकाळी तुरळक पाऊसासह वादळी वाºयाने आंबा, लिंबू बागांचे आतोनात नुकसान झाले. ज्वारी, बाजरी, कांदे आदी पिकांचेही नुकसान झाले आहे. केळी झाडाची पाने फाटून या पिकालाही फटका बसला आहे.
तालुक्यात बहुतांश भागात अशाप्रकारे पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या ज्वारी, बाजरी कापणी, खुडणी, काढणीचा शेवटचा हंगामा आहे. दुष्काळी स्थितीचा फटका बसल्याने थोडफार हंगाम होता त्यावर निसर्गाने नुकसानीचा जणू नांगरच फिरविला आहे.
याआधी पाण्याअभावी ज्वारी, बाजरी, केळी, मोसंबी आदी पिके वाळून शेतकºयांची नुकसान झाले आहे. तर यावर्षी आंबा चांगला बहरला होता. मात्र दुष्काळी स्थितीचा फटका बसल्याने कैरी बारीक पडली. शेतकºयांना आंबा उत्पन्नाची मोठी आशा होती. व्यापाºयांनीही जामदा उजवा व डावा कालव्यांलगत बांधावरील झाडे, आमरायांचा हजारो रुपयांनी सौदा केलेला होता. मात्र अवकाळी पाऊस व वादळाने झाडावरील कैरीचा सडा पडून मोठे नुकसान झाले आहे. अर्ध्याच्यावर आंब्याचे नुकसान झाल्याचे शेतकरी, व्यापाºयांनी सांगितले. वादळाने शहरासह तालुक्यात वीज पुरवठा देखिल खंडित झाला होता.
यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे सावट असले तरी गुढे परिसरात गिरणेच्या कृपेने गुढे, बहाळ, कोळगाव, घुसर्डी, गोंडगाव, खेडगाव मध्ये थोडे फार बागायती क्षेत्र असून या क्षेत्रात लिंबू ,केळी, ऊस, मोसंबी, आणि आंबा अशीे फळबाग आहे. फळबाग जगवण्यासाठी शेतकरी टँकंरने पाणी टाकत आहेत उत्पन्न आले नाही आले तरी चालेल परतु माझी बाग जगायला हवी यासाठी प्रयत्न करत असतांनाच अवकाळी पाऊस आणी वादळाने या पिकांचे नुकसान झाले आहे. जामदा डावा कालवा लगत आंब्याचा बहार चांगला आला होता मात्र आंबा आणि लिंबू, केळी पिकांचा तोडांशी आलेला घास अवकाळीने हिरावुन नेला आहे.
अमळनेरात द्विशाताब्दी महोत्सवाचा मंडप जमीनदोस्त
अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानतर्फे २१ ते २९ एप्रिल दरम्यान साजरा होणाºया द्विशताब्दी महोत्सवा निमित्त बोरी नदी वाळवंटात पारायण मंडप, महायज्ञ कुंड, भक्त निवास आणि इतर सुविधा उभारण्यात आल्या होत्या, मात्र रविवारी रात्री नऊ च्या सुमारास आलेल्या वादळात यज्ञ मंडप कोसळला आहे तर इतर सुविधा कक्षांचे पडदे देखील सोसाट्याच्या वाºयामुळे फाटले आहेत. यामुळे पाच दिवसावर येऊन ठेपलेल्या द्विशताब्दी महोत्सव कसा साजरा होणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान वाडी संस्थान चे गादीपती संत प्रसाद महाराज परगावी गेले होते मात्र सायंकाळी ते परत आले. यावेळी त्यांनी सांगितले की, महोत्सवाच्या तारखेपर्यंत युद्धपातळीवर काम करण्यात येवून पुन्हा हवा तसाच मंडप उभारला जाईल.सद्गुरु संत सखाराम महाराज यांच्या समाधीस १८१८ ते २०१८ असे दोनशे वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन वाडी संस्थान तर्फे करण्यात आले आहे. या दरम्यान येथे विराट संत संमेलन देखील होणार आहे. तसेच अमळनेर साईगजानन नगरात विद्युत खांब व तार तुटली. रात्रभर अंधार होता.
पाचोरा तालुक्यातील मोहाडी येथे
वीज कोसळून चारा खाक
गुरांसाठी रचून ठेवलेल्या चाºयाच्या गंजीवर वीज कोसळून चारागंजी बेचिराख झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील मोहाडी येथे घडली. १४ रोजी रात्री ९ चे सुमारास पाचोरा तालुक्यात अचानक विजांच्या कडकडाटासह वादळ सुटले व कोसळून मोहाडी येथील रना हरी पवार यांच्या शेतातील ५० हजाराचा चारा खाक झाला. यामुळे रना पवारांच्या गुरांवर उपासमारीची पाळी आली.ह्या वादळामुळे शहरातील बकाल वस्तीत रहाणारे व पाल टाकून कुटुंब रहात असलेले वादळामुळे उघड्यावर आले .आंब्याचे मोहोर गळून पडले .