चोपडा तालुक्यात वादळी पावसाचा ३६२ शेतकऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 09:16 PM2019-04-18T21:16:44+5:302019-04-18T21:16:51+5:30
६० गावांमध्ये झाले पिकांचे नुकसान
चोपडा : गेल्या दोन दिवसांपूर्वी चोपडा तालुक्यात झालेले चक्री वादळ, पाऊस व गारपिटीमुळे दोनशे हेक्टर बागायती क्षेत्रावरील केळी, लिंबू, आंबा, मका व बाजरी या पिकांचे नुकसान झाले असून ६० गावातील ३६२ शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला आहे. बाधित झालेल्या क्षेत्रातील पिकांचे पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवरून सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार अनिल गावित यांनी दिली.
१४ रोजी पहिल्या दिवशी वेळोदे, गलंगी, धानोरा प्र.चो., भवाळे, बुधगाव, घोडगाव, मालखेडा , वाळकी, शेंदणी, कुसुंबा, अनवर्दे, दगडी, गणपूर, लोणी, खर्डी, वरगव्हान, इच्छापूर, बडवाणी, बिडगाव, अडावद, विरवाडे, पंचक, पारगाव, चांदसनी, रुखनखेडे प्र.अ., चोपडा, चहार्डी, धुपे बु., भारडू, हातेड खु, नागलवाडी वराड, बोरअजंटी, आडगाव, चौगाव, चुंचाळे, मामलदे , कृष्णापुर ,कजार्णे, लासुर, सत्रासेंन, उमर्टी, अंमलवाडी, मोरचिडा तर १५ रोजी हातेड बु., बुधगाव, वडती, खरद, नारद, अंबाडे, नरवाडे, बोरखेडा, पंचक, पारगाव, चांदसनी, रुखनखेडे प्र.अ., चौगाव, चुंचाळे, मामलदे, कजार्णे आदी ६० गावांमध्ये चक्री वादळ, पाऊस व गारपिटीमुळे दोनशे हेक्टर बागायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.