चोपडा तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचे त्रिशतक पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 06:58 PM2020-07-05T18:58:30+5:302020-07-05T18:59:04+5:30
पुन्हा २३ रुग्ण आढळले
चोपडा : तालुक्यातील आरोग्य विभागाकडे ५ रोजी ५६ अहवालांची माहिती प्राप्त झाली. त्यापैकी २३ अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याने चोपडा तालुक्यात कोरोना बाधित असलेल्या रुग्णांचे त्रिशतक झाले आहे. ३७ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
चोपडा शहरात १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात यापूर्वी बाधित आलेल्या वृंदावन धाम परिसरात एकाच कुटुंबातील सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात ३ वर्षे वयाची बालिका तर ५ वर्षे व १३ वर्षे वयाचा बालक, १६ वर्षे वयाचा मुलगा, ४३ वर्षे वयाचा पुरुष,४५ आणि ६५ वर्षे वयाच्या महिला रुग्णांचा समावेश आहे.
पंचक येथे पुन्हा नवीन सहा रुग्ण कोरोना बाधित आले आहेत. त्यात चार पुरुष रुग्णांचा आणि दोन महिला रुग्णांचा समावेश आहे. पुरुष रुग्णांमध्ये २८ वर्षे, ५० वर्षे, ५४ वर्षे आणि ४८ वर्षे असा वयोगट आहे. तर महिला रुग्णांमध्ये ५७ आणि ६५ वर्षे वयाच्या महिलांचा समावेश आहे. पुनगाव येथे एक नवीन २५ वर्षे वयाचा युवक तर अकुलखेडा येथे एक नवीन ५५ वर्षे वयाचा पुरुष रुग्ण बाधित झाला आहे. लासुर येथे पुन्हा नव्याने ४९ वर्षे वयाचा पुरुष रुग्ण पॉझिटिव्ह झाला आहे.
आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या चोपडा तालुक्यात ३१२ एवढी झाली असून आतापर्यंत ५१ संशयितांचे अहवाल येण्याचे प्रलंबित आहे. तर २१ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आणि १८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली.