चोपड्याच्या रत्नावतीला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:35+5:302021-06-05T04:12:35+5:30

ही नदी सातपुडा पर्वत रांगांमध्ये उगम पावली आहे. खूप लांबून या नदीत पाणी येत असते. ५ जुलै २००६ ला ...

Chopda's Ratnavati is polluted | चोपड्याच्या रत्नावतीला प्रदूषणाचा विळखा

चोपड्याच्या रत्नावतीला प्रदूषणाचा विळखा

Next

ही नदी सातपुडा पर्वत रांगांमध्ये उगम पावली आहे. खूप लांबून या नदीत पाणी येत असते. ५ जुलै २००६ ला या नदीचे रौद्ररूप चोपडा शहरवासीयांनी अनुभवले आहे.

सांडपाणी व टाकाऊ वस्तू थेट नदीत

या नदीत सर्व रहिवासी घरांचे सांडपाणी गटारीमार्फत येत असते. तसेच याच नदीच्या पात्रात मासे व मटण विक्रेते उर्वरित टाकाऊ अवशेष टाकत असतात. भाजीपाला विक्रेते भाज्यांचे टाकाऊ व सडलेला भाग टाकतात. तसेच नागरिकही या नदीपात्रात प्लास्टिकचा केरकचरा टाकत असतात आणि अनेक नागरिक याच नदीच्या पात्रात प्रातर्विधीसाठी सकाळी येत असतात. म्हणून या रत्नावती नदीचे पात्र प्रदूषित बनले आहे. पावसाळ्यातील चांगला पाऊस पडल्यानंतर या नदीला पूर आल्यानंतर पात्र नदीच्या पाण्यानेच स्वच्छ होत असते.

नाल्यांचे पाणी येते नदीत

सर्व नाले याच नदीत येत असल्याने, नदीनाल्यांमधून बहुतांश कचरा हा या नदीपात्रात येत असतो. अरुणनगरमधून येणारा नाला, रामपुरा भागातून येणाऱ्या नाल्यामार्फत सर्वच घाण पाणी या नदीपात्रात येत असते. म्हणून या नदीचे पात्र हे प्रदूषित बनले आहे. यामुुळे पावसाळ्यात शहरात रोगराई पसरू शकते. ही नदी पहाडातून येत असल्याने प्रथम पुरात वृक्ष तोडून टाकले अवशेष या नदीच्या पाण्यासोबत वाहून येतात. हा काडी कचरा या नदीवर असलेल्या लहान पुलांच्या बोगद्यात अडकतात आणि तेथून पाणी तुंबते व शहरात पाणी घुसण्याची शिरण्याची शक्यता असते.

स्वच्छ भारत योजनेंतर्गत येथील पालिकेतील आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी यांनी दोन वर्षांपूर्वी एक दिवस येथील रत्नावती नदीपात्रातील घाणीची साफसफाई मोहीम राबवली होती. या विषयाकडे नगराध्यक्षा मनीषा चौधरी व गटनेते जीवन चौधरी यांनी लक्ष देऊन साफसफाई करण्यासाठी काहीअंशी प्रयत्न केले; परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने कहर केल्याने नदी स्वच्छ करून गाळ कढण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

५० लाखांची तरतूद

दरम्यान गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या रत्नावती नदीचे संवर्धन व्हावे यासाठी ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद केलेली असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या नदीतून गाळ काढला जात नसून केवळ काटेरी झाडे-झुडपे मुळासकट काढली जात असतात. शहरात पाणी शिरू नये म्हणून या नदीच्या पात्राला खोल करून वाहणाऱ्या पाण्याला दिशा दिली जाते; परंतु सध्या खोलीकरण केले जात नसल्याने नदीपात्र अरुंद झाले आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने नदीला नदीचे रूप शिल्लक राहिलेले नाही. ही नदी गटारगंगा बनली आहे. या नदीपात्रात दोन्ही थडीला काँक्रीट रस्ता बनवून सुशोभीकरण करता येऊ शकते. मात्र, या विषयांची सत्ताधारी आणि विरोधकांना विसर पडला आहे. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार तरी खर्च होतो काय? याबाबत साशंकता आहे.

०५सीडीजे ६

Web Title: Chopda's Ratnavati is polluted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.