चोपडय़ात शेतक:यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा

By Admin | Published: April 26, 2017 12:13 PM2017-04-26T12:13:12+5:302017-04-26T12:13:12+5:30

शेतक:यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी कृती समितीतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

Chopdiya Farmer: A Morcha for Debt Waiver | चोपडय़ात शेतक:यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा

चोपडय़ात शेतक:यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा

googlenewsNext

 चोपडा, दि.26- शेतक:यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी कृती समितीतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

बुधवारी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृहासमोरील शेतकरी कृती समिती कार्यालयापासून मोर्चास सुरवात झाली. बसस्थानक, शिवाजी चौक, मेनरोड, चावडीवरून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. 
शेतक:यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, शेतक:यांना खते, बियाणे वाजवी भावात मिळाली पाहिजे, वीज माफी मिळाली पाहिजे, शेतक:यांना हक्काचा पीकविमा मिळाला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाली पाहिजे, शेतक:यांच्या मुलांना शैक्षणिक फी माफ झाली पाहिजे. शेतक:यांना इच्छा मरणाची परवनागी दिली पाहिजे, आदी मागण्यांचे निवेदन परिविक्षाधिन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार दीपक गिरासे यांना देण्यात आले. 
 1 जून पासून शेतकरी संपावर जाणार असून, स्वत:पुरतेच पीक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस.बी.पाटील यांनी केले. यात संजय हिरामण सोनवणे, डॉ. रवींद्र निकम, अजित पाटील, दीपक पाटील, वसंत पाटील, प्रदीप पाटील, विनायक सोनवणे, नवनीत पाटील, कुलदीप पाटील, जगदीश पाटील, डॉ. सुभाष देसाई, हुकूमचंद पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.(वार्ताहर)

Web Title: Chopdiya Farmer: A Morcha for Debt Waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.