चॉपर हल्ल्यातील तरुणाचा मृतदेह पोलीस बंदोबस्तात पोहचला घरी
By admin | Published: July 15, 2017 12:47 PM2017-07-15T12:47:24+5:302017-07-15T12:47:24+5:30
मुंबई येथे उपचारार्थ हलविताना वाटेतच नाशिकजवळ मृत्यू झाला.
Next
ऑ लाईन लोकमतजळगाव, दि. 15 - राजीव गांधी नगरात चॉपर हल्लय़ात जखमी झालेल्या राहुल प्रल्हाद सकट (22) या तरुणाला मुंबई येथे उपचारार्थ हलविताना वाटेतच नाशिकजवळ मृत्यू झाला. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास राहुलचा मृतदेह जळगावात आणण्यात आला. आरोपींना अटक झाल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची नातेवाईकांनी भूमिका घेतल्याने तसेच दिवसभर तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्तात मृतदेह घरी पोहचविण्यात आला़ याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून तिघे नातेवाईकांसह फरार झाले आहेत़शेजारच्याकडून जेवण घेऊन जात असताना राहुल सकट याला बुधवारी रात्री आरोपी सत्यसिंग बावरी, रवीसिंग बावरी, मलिंदसिंग बावरी यांनी रस्त्यात अडवून शिवीगाळ केली़ राहुलने त्याचा जाब विचारला असता सत्यसिंग याने धारदार शस्त्राने राहुलच्या पोटात भोसकल़े राहुलला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होत़े यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आल़े याप्रकरणी राहूलचा भाऊ अजय प्रल्हाद सकट याच्या फिर्यादीवरुन सत्यसिंग बावरी, मलिंदसिंग बावरी, रवीसिंग बावरी, मालाबाई बावरी, कलाबाई बावरी सर्व रा़राजीवगांधीनगर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े मालाबाई बावरी व कलाबाई यांना अटक केली आह़े सायंकाळी 6़20 वाजता मृतदेह नाशिकहून रुग्णवाहिकेतून (एम़एच़17 के ़ 5660) जळगावात पोहचला़ राजीव गांधीनगरात मृतदेह पोहचण्यापूर्वीच रामानंदनगर पोलिसांनी रुग्णवाहिका श्रीधरनगरजवळ अडविली़ याठिकाणी पोलीस निरिक्षक बी़ज़ेरोहम व कर्मचा:यांनी नातेवाईकांनी समजूत घातली़ मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत़े पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर अखेर अर्धातासानंतर 7 वाजता मृतदेह घराकडे घेवून जाण्यासाठी चारचाकी गाडी बोलविण्यात आली़ यावेळी घटनास्थळी एकच गर्दी जमली होती़ याठिकाणी मृतदेह उतरवून राहुलच्या घरी पोहचण्यात आला़