एस.टी.संपामुळे चोपडा आगाराला सात लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 05:48 PM2018-06-09T17:48:01+5:302018-06-09T17:48:01+5:30
चोपडा येथील आगारातील एकही बस जागेवरून न हलल्याने कर्मचारी संघटनेचा एस.टी.बंद १०० टक्के यशस्वी झाला आहे.
चोपडा, जि.जळगाव : येथील आगारातील एकही बस जागेवरून न हलल्याने कर्मचारी संघटनेचा एस.टी.बंद १०० टक्के यशस्वी झाला आहे. मात्र यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
चोपडा बस स्टँड मध्ये एकही बस फलाट मध्ये लागली नाही. एवढेच नाही तर बाहेरून आगारातील मध्यप्रदेश, गुजरात मधून आलेल्या व महाराष्ट्रातून इतर आगारातून आलेली एकही बस बाहेर गेली नाही. आगार प्रमुख किशोर अहिरराव यांनी माहिती देताना सांगितले की, चोपडा आगारातील बसेस चा ४९० फेऱ्यांमधून २७०० किमी अंतर चालणाºया बसेस ची चाके थांबली होती. आधीच तोट्यात असलेल्या आगाराची एक दिवसाचे जवळपास ७ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. सर्व चालक आणि वाहक आगरातच थांबून होते. तसेच बाहेरील आगारातून येणाºया बसेस आगारात अडकून पडणार म्हणून एक किमी अंतरावर प्रवाशांना उतरवून संबंधित चालक व वाहक परस्पर रवाना झाले.