चोपडा मंडळ अधिकाऱ्यासोबतच पंटर एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 03:27 PM2020-02-08T15:27:28+5:302020-02-08T15:29:34+5:30

वाळू वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी दरमहा आठ हजार रुपये लाचेची मागणी करणाºया चोपडा येथील मंडळ अधिकाºयास लाचलुचपत पथकाने शुक्रवारी मध्यरात्री पंटरासह अटक केली.

Chopra along with the board officer, into the nets of the Panther ACB | चोपडा मंडळ अधिकाऱ्यासोबतच पंटर एसीबीच्या जाळ्यात

चोपडा मंडळ अधिकाऱ्यासोबतच पंटर एसीबीच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देवाळू वाहतुकीसाठी ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी आठ हजारांची मागितली लाचतीन दिवसांनंतर महसूल कार्यालयातील दुसरी घटना



चोपडा, जि.जळगाव : वाळू वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी दरमहा आठ हजार रुपये लाचेची मागणी करणाºया चोपडा येथील मंडळ अधिकाºयास जळगाव लाचलुचपत पथकाने शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास खाजगी पंटरासह अटक केल्याने चोपड्यासह जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. मंडळाधिकारी राजेंद्र आधार वाडे. (वय ५०, रा.आंबेडकर नगर, चोपडा) व खाजगी पंटर समाधान रमेश मराठे (वय २४, रा.पाटील गढी, चोपडा) अशी अटकेतील व्यक्तींची नावे आहेत.
विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच शेतीच्या मृत्यूपत्रावरून नाव लावण्याच्या कारणावरून १५ हजार रुपयांची लाच घेताना नायब तहसीलदार जितेंद्र पंजे यांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर तिसºया दिवशी मंडळ अधिकारी लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
चोपडा तालुक्यातील २५ वर्षीय तक्रारदाराचे ट्रॅक्टर वाळू वाहतुकीदरम्यान कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दरमहा आठ हजार रुपयांची मागणी मंडळाधिकारी राजेंद्र वाडे यांनी केली होती. याबाबत जळगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदविल्यानंतर सापळा रचण्यात आला. विशेष म्हणजे शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता मंडळाधिकारी वाडे यांना लाच स्वीकारताना पथकाने ताब्यात घेतले.
या पथकाने केली कारवाई
पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी व संजय बच्छाव रवींद्र माळी, हवालदार अशोक आहिरे, हवालदार सुरेश पाटील, सुनील पाटील, नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने कारवाई केली.
 

Web Title: Chopra along with the board officer, into the nets of the Panther ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.