चोपडा येथे शरदचंद्रिका पाटील यांच्या आठवणींना दिला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 06:40 PM2018-12-05T18:40:19+5:302018-12-05T18:41:30+5:30

महाराष्ट्राच्या माजी शिक्षण मंत्री शरदचंद्रिका सुरेश पाटील यांना ३६व्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या स्मृतीस्थळी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Chopra lights up the memories of Sharadchandra Patil | चोपडा येथे शरदचंद्रिका पाटील यांच्या आठवणींना दिला उजाळा

चोपडा येथे शरदचंद्रिका पाटील यांच्या आठवणींना दिला उजाळा

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्राच्या माजी शिक्षणमंत्री शरदचंद्रिका पाटील यांना श्रद्धांजलीडी.फार्मसी, एनसीसी, एनएसएसतर्फे ३० जणांनी केले रक्तदान

चोपडा : महाराष्ट्राच्या माजी शिक्षण मंत्री शरदचंद्रिका सुरेश पाटील यांना ३६व्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या स्मृतीस्थळी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या स्मृतींना उजाळाही देण्यात आला. ५ रोजी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम झाला.
सर्वप्रथम महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक व माजी आमदार डॉ.सुरेश पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, माजी आमदार कैलास पाटील, जगदीश वळवी, यावलचे माजी आमदार रमेश चौधरी, दिलीपराव सोनवणे, पंकज शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक समूहाचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, तहसीलदार दीपक गिरासे, चोसाकाचे माजी चेअरमन अ‍ॅड.घनश्याम पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.स्मिता पाटील, उपाध्यक्षा आशा पाटील, जि.प.आरोग्य सभापती दिलीपराव पाटील, चंद्रशेखर पाटील, भाजपचे घनश्याम अग्रवाल, जि.प.सदस्या डॉ.प्रा.नीलम पाटील, माजी नगराध्यक्षा ताराबाई पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुप्रिया सनेर, नगरसेविका अश्विनी गुजराथी, संस्थेचे संचालक प्रा.डी.बी.देशमुख, शेतकी संघाचे चेअरमन शेखर पाटील, अमर संस्थेचे चेअरमन चंद्रकांत पाटील, चुडामण पाटील, सूतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील, पं.स.माजी सभापती डी.पी.पाटील, चोसाका संचालक गोपाल धनगर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, शहराध्यक्ष के.डी. चौधरी, पं.स.माजी सभापती प्रमोद पाटील, अ‍ॅड.जे.आर.पाटील, बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर पाटील, डॉ.बी.आर.पाटील, प्रल्हाद पाटील, माजी प्राचार्य पी.बी. पाटील, इंदिराताई पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव, संजय कानडे, विजयाताई पाटील, विजय सपकाळे, राजेंद्र पारे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.मनोज पाटील, डॉ.विकास हरताळकर, डॉ.विजय पोतदार, डॉ.अमित हरताळकर, डॉ.विनित हरताळकर, डॉ.लोकेंद्र महाजन, डॉ.पराग पाटील, डॉ.रवींद्र पाटील, अनिल साठे, मधुकर पाटील, प्रकाश रजाळे, राजेंद्र सोनवणे, रमेश पाटील, डॉ.अशोक कदम, अनिल कदम, राजेंद्र पाटील, डॉ.गंगाधर सूर्यवंशी, गो.बा.महाजन, लिंबा पाटील, हेमंत शिंदे, डी.बी.पाटील, शिवराम पाटील, सुभाष पाटील, शांताराम पाटील, प्रमोद पाटील, अकबर पिंजारी, ए.टी.पाटील, भरत पाटील, ए.टी.साळुंखे, सुभाष पाटील, संजीव सोनवणे, मनोज सनेर, शेतकरी कृती समितीचे एस.बी.पाटील, वंदना बाविस्कर, भागवत पाटील, प्रदीप पाटील, जगन्नाथ बाविस्कर, देवेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, राजू शर्मा, महेश शर्मा, तुळशीराम पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक अशोक चौधरी, अरुण कंखरे, साहेबराव कंखरे, भरत पाटील, डॉ.सुवालाल पाटील, नंदकिशोर सांगोरे, सतीश बोरसे, प्रवीण गुजराथी, अनिल वानखडे, राजू शर्मा, मनीष पारिख, वसंत पवार, डॉ.राहुल पाटील, कांतीलाल पाटील, डॉ.पांडुरंग सोनवणे, नगरसेविका सुरेखा माळी, सरला शिरसाठ, दीपिका चौधरी,डॉ.दीपक पाटील, डॉ.लोकेंद्र महाजन, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, मंडळाधिकारी अमृतराव वाघ, भावना माळी, अनिस बोहरा, राकेश पाटील, चंद्रकांत पाटील, संजय बारी, पंकज पाटील, तुषार सूर्यवंशी, किशोर चौधरी, दीपक चौधरी, पं.स.उपसभापती एम.व्ही.पाटील, मुख्याध्यापक व्ही.आर.पाटील, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, बापू चौधरी यांच्यासह असंख्य मान्यवरांनी स्मृतीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्व विभागातील प्राचार्य, प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी डी.फार्मसी, एनसीसी, एनएसएसतर्फे ३० जणांनी रक्तदान केले. स्मृतिस्थळाची सजावट दिनेश बाविस्कर यांनी तर प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी, मुख्याध्यापक नीळकंठ सोनवणे, डॉ. प्रा.शैलेश वाघ, दिलीप साळुंखे, अशोक साळुंखे, प्राचार्य आर.एन.पाटील यांच्यासह इतर विभागातील प्रमुखांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कलाशिक्षक ए.पी.पाटील व आर.आर.बडगुजर यांनी केले.

Web Title: Chopra lights up the memories of Sharadchandra Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.