गुरे मोकाट सोडणा-यांना चोपडा पालिकेने केला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 08:36 PM2019-09-10T20:36:50+5:302019-09-10T20:36:59+5:30
चोपडा : शहरात शेकडो पशुपालक त्यांच्याकडील गुरांना मोकाट सोडून देतात. याचा नागरिकांना त्रास होत असल्याने नगरपालिकेने सर्व मोकाट जनावरांना ...
चोपडा : शहरात शेकडो पशुपालक त्यांच्याकडील गुरांना मोकाट सोडून देतात. याचा नागरिकांना त्रास होत असल्याने नगरपालिकेने सर्व मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्याची मोहीम सुरू केली आहे. ९ रोजी २९ मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात कोंडले आहे.
ही कारवाई पालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी व्ही.के. पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. शहरातील शिवाजी महाराज चौक, बस स्थानक परिसर, पाटील दरवाजा, बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणांहून २९ मोकाट जनावरे पकडून पालिकेच्या कोंडवाड्याात टाकले आहेत.
जनावरे पशुपालकांनी मोकाट सोडू नयेत, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी केले आहे. पकडलेल्या मोकाट जनावरांना मालकांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे.
...तर लिलाव करू
ही जनावरे पुन्हा मोकाट म्हणून रस्त्यांवर पकडली गेली तर त्यांचा थेट लिलाव करण्यात येईल, असेही पालिकेने काळविले आहे.