चोपडा न.प. हद्दीतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:41+5:302021-06-27T04:12:41+5:30
याबाबत गोरगावलेचे माजी सरपंच आशाबाई जगन्नाथ बाविस्कर यांनी चोपड्याचे तहसीलदार अनिल गावीत व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदन दिले ...
याबाबत गोरगावलेचे माजी सरपंच आशाबाई जगन्नाथ बाविस्कर यांनी चोपड्याचे तहसीलदार अनिल गावीत व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदन दिले होते. तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्याकडेही तगादा सुरू होता. यासाठी न.प.चे गटनेते व नगरसेवक जीवन चौधरी यांनीही या रस्तादुरुस्तीच्या कामासाठी अडसर ठरणारी न.प.ची पाईपलाईन त्वरित काढून देऊन हा रस्ता मोकळा करून दिला होता. या रस्त्यावरील अतिक्रमण मोकळे केल्यामुळे हा रस्ता त्वरित कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे.
याबाबत चोपडा मार्केट कमिटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर, एस. टी. कोळी, संघटनेचे पदाधिकारी मधुसूदन बाविस्कर, लखिचंद बाविस्कर, वैभवराज बाविस्कर यांनी केलेल्या प्रयत्नांनाही यश आले आहे. न.प. हद्दीतील गोरगावले रस्त्याच्या आजुबाजूच्या कॉलनीतील रहिवाशांना वर्षानुवर्षे या रस्त्यावरून जाताना मरणयातना सहन कराव्या लागत होत्या. आता हा रस्ता कॉंक्रिटीकरण होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.