चोपडा न.पा. पाईपलाईनप्रश्नी प्रांतांनी ऐकून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:12 AM2021-07-09T04:12:41+5:302021-07-09T04:12:41+5:30

चोपडा : चोपडा न.पा. पाणीपुरवठा योजनेसाठी पाईपलाईनप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांनी गुरुवारी कठोरा ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या. यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांंच्या उपस्थितीत ...

Chopra N.P. Pipeline questions The problems of the villagers heard by the provinces | चोपडा न.पा. पाईपलाईनप्रश्नी प्रांतांनी ऐकून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या

चोपडा न.पा. पाईपलाईनप्रश्नी प्रांतांनी ऐकून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या

googlenewsNext

चोपडा : चोपडा न.पा. पाणीपुरवठा योजनेसाठी पाईपलाईनप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांनी गुरुवारी कठोरा ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या. यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांंच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांपासून चोपडा न. प.च्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या नव्या कामाला कठोरा ग्रामस्थांचा काही मागण्या मान्य होईपर्यंत विरोध कायम असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कठोरा शेतकरी आणि प्रशासनाकडून प्रांत सुमीत शिंदे, तहसीलदार अनिल गावित, उपजिल्हा पोलीस अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक संदीप आराख, नपा मुख्याधिकारी अविनाश गांगोडे आणि अभियंते यांच्यात कठोरा गावात ८ रोजी दुपारी बैठक पार पडली. कठोरा गावाकडून प्रतिनिधी म्हणून दीपक मदन पाटील आणि अशोक गोरख पाटील यांनी योग्य बाजू मांडली.

मागच्या महिन्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गोरे आणि कठोरा ग्रामस्थ यांच्या बैठकीत उपस्थित केलेल्या सर्व मागण्यांना चोपडा नपाचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी उत्तर दिले असताना त्यांचे उत्तर गावकऱ्यांनी मान्य न करता सर्व उत्तरे खोडून आपल्या मागण्या ठळकपणे प्रांत अधिकारी सुमीत शिंदे यांच्यासमोर मांडल्या. सर्व प्रशासन कठोरा येथे गेले होते.

चोपडा न.पा. पाणीपुरवठा योजना भविष्यातील २०४९ ची लोकसंख्या लक्षात घेऊन भविष्य योजना आहे; पण प्रत्यक्षात योजना बनवताना नदीपात्रात जिवंत पाणीसाठा उपलब्ध नसताना किंवा त्यासाठी सोय करण्याची तरतूद नसताना २०४९ साठीची योजना बनवलीच कशी, हा नवा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तसेच ही योजना फक्त हतनूर धरण पाणी आवर्तनावर अवलंबून असताना न.प.कडून बारमाही पाणी उपसा का होतो, कठोरा नदीपात्रातील डोहाच्या पाण्यावर चोपडा न.प.चे पाणी आरक्षण नसतानाही पाणी उपसा का होतो, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

मुख्याधिकारी गांगोडे यांच्याकडून नेहमीप्रमाणे प्रत्येक मागणीवर उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झालेला आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेले, मुख्याधिकारी यांनी कठोरे ग्रामसेवक पवार यांच्यावर पत्रव्यवहार न करण्यासंदर्भात दबाव आणला.

ग्रामस्थांच्या सर्व मागण्या ऐकून प्रांत सुमीत शिंदे यांनी योग्य निष्कर्ष काढून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल, अशी ग्वाही दिली. पुढील बैठक ही जिल्हाधिकाऱ्यांसोबत होईल, असेही सांगितले. आज झालेल्या बैठकीत चर्चा केलेले सर्व बिंदू तहसील ऑफिस चोपडा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात येतील.

आजच्या बैठकीला गावातील सरपंच, सदस्य, सर्व शेतकरी, ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते आणि महिला वर्ग उपस्थित होते. गावातील सर्व लोकांनी आपले शेतीचे आणि इतर कामे बंद करून या बैठकीला उपस्थिती लावली. कठोरा मंडळ अधिकारी बेलदार, तलाठी कंखरे आणि ग्रामसेवक पवार यांनी बैठक सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

Web Title: Chopra N.P. Pipeline questions The problems of the villagers heard by the provinces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.