चोपड्याचे शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:18 AM2021-07-29T04:18:04+5:302021-07-29T04:18:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विनंती बदली मान्य न झाल्याने संतापात विकल्पाचा कागद फाडून समुपदेशनाच्या सभेतच फेकल्याने चोपड्याचे शिक्षण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विनंती बदली मान्य न झाल्याने संतापात विकल्पाचा कागद फाडून समुपदेशनाच्या सभेतच फेकल्याने चोपड्याचे शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर गजरे यांना सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी निलंबित केले आहे. याबाबत आदेश काढण्यात आले असून त्यांना मुक्ताईनगर मुख्यालयात थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २३ जुलैला हा प्रकार घडला.
जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात समुपदेशनाने दोन दिवस बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात गजरे यांनी विनंती बदलीसाठी अर्ज केला होता. मात्र, चोपडा पेसा क्षेत्रातील रिक्त परिस्थितीमुळे ही बदली मान्य करता येणार नाही, असा समितीने निर्णय घेतल्यानंतर गजरे यांनी विकल्पाचा कागद सभेतच सर्व अधिकाऱ्यांसमोर फाडून फेकला होता. हे वर्तन गैरशिस्तीचे व कर्तव्यात कसूर असल्याचे सिद्ध होत असल्याने त्यांना शिक्षण विस्तार अधिकारी या पदावरून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश सीईओ डॉ. आशिया यांनी तातडीने काढले.