चोपडा येथे नगराध्यक्षांच्या दालनातील खूर्च्यांची फेकाफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 03:18 PM2018-09-06T15:18:53+5:302018-09-06T15:22:15+5:30
शहरातील पाणी प्रश्न चांगलाच पेटला. गुरुवारी झालेल्या सभेप्रसंगी संतप्त शहरवासीयांनी नगराध्यक्ष यांच्या दालनातील खूर्च्यांची फेकाफेक केली. मोर्चेकºयांनी नगराध्यक्षांच्या टेबलवरील काचांसह त्याच ठिकाणी मडके फोडले. हा गोंधळ तब्बल चार तास सुरू होता.
चोपडा : शहरातील पाणी प्रश्न चांगलाच पेटला. गुरुवारी झालेल्या सभेप्रसंगी संतप्त शहरवासीयांनी नगराध्यक्ष यांच्या दालनातील खूर्च्यांची फेकाफेक केली. मोर्चेकºयांनी नगराध्यक्षांच्या टेबलवरील काचांसह त्याच ठिकाणी मडके फोडले. हा गोंधळ तब्बल चार तास सुरू होता.
शहरातील मल्हारपुरा, रंगराव आबा नगर, सानेगुरुजी वसाहत यासह इतर भागात पिण्याचे पाणी दहा ते बारा दिवसांपासून येत नसल्याने व मल्हार पुरा भागातील नादुरुस्त कूपनलिकाही महिनाभरापासून पालिकेने दुरुस्त न केल्याच्या संतापाने या भागातील महिला व नागरिकांनी ६ रोजी सर्वसाधारण सभेचे औचित्य साधत पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा आणला. मोर्चाचे नेतृत्व या भागातील शिवसेनेचे नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष किशोर चौधरी, संध्या महाजन यांनी केले. मोर्चेकरी प्रचंड संतप्त झाले होते. त्यांनी प्रशासकीय इमारतीचे चॅनल गेट लावले असता ते उघडून वेगात पळत जाऊन नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांच्या दालनात प्रवेश केला. त्यांना घेराव घातला व नगराध्यक्षांच्या दालनातील खुर्च्यांची फेकाफेक केली. नगराध्यक्षांच्या टेबलावरील काच फोडल्या. तेथेच मातीचे हंडे फोडले. मोर्चेकरी संतप्त असल्याने कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.