वॉटर कप स्पर्धेत पारोळयातील चोरवड, तर अमळनेरात नगाव खुर्द प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:03 AM2018-08-13T01:03:14+5:302018-08-13T01:04:22+5:30

चोरवड गाव झाले टँकरमुक्त

Chorwad in Parola, in water cup competition, and firstly Ngaon khard first | वॉटर कप स्पर्धेत पारोळयातील चोरवड, तर अमळनेरात नगाव खुर्द प्रथम

वॉटर कप स्पर्धेत पारोळयातील चोरवड, तर अमळनेरात नगाव खुर्द प्रथम

Next



पारोळा/अमळनेर, जि.जळगाव : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत पारोळा तालुक्यात चोरवड, तर अमळनेर तालुक्यातून नगाव खुर्द गाव प्रथम आले आहे. या गावांच्या लोकप्रतिनिधींना रविवारी पुणे येथे झाला.
जलसमृद्धीची चळवळ वाढावी यासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्न केले. त्याही पुरस्काराच्या रूपातून फलश्रुती असल्याचे मानले जात आहे.
पारोळा तालुक्यात चोरवडपाठोपाठ टेहू द्वितीय, तर बहादरपूर तृतीय विजेते ठरले. पानी फाऊंडेशनतर्फे प्रथम पारितोषिक रू. १० लाख तर महाराष्ट्र शासनातर्फे प्रथम पारितोषिक रू. ५ लाख, व्दितीय रू. ५ लाख व तृतीय रू. ३ लाख मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
अमळनेर तालुक्यात नगाव खुर्द गावाने पहिला क्रमांक मिळवला असून, या गावाने जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळवले आहेत.
सरपंच प्रेरणा बोरसे यांनी गावाला एकत्र करून 400 हेक्टर कंपार्टमेंट बंडिंग ,90 हजार घनमीटर काम , 29 माती बांध, साखळी बांध, 3 किमी नाला खोलीकरण, शेततळे, 100 टक्के शोषखड्डे अशी भरपूर कामे लोकसहभागातून केली. यामुळे विहिरींची पाणी पातळी १० फुटाने वाढली, तर भूगर्भात सहा कोटी लीटर पाणी साठा निर्माण होणार आहे. नगाव खुर्द गावाने प्रपोगंडा न करता श्रमदानाला महत्व देत गावाच्या एकीमुळे प्रथम क्रमांक मिळवला आहे. आमिरखानने भेट दिल्याने चर्चेत व प्रसिद्धीस असलेले जवखेडा गावाला मात्र कमी गुण मिळाल्याने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तर नगाव बुद्रुक तृतीय आले.

Web Title: Chorwad in Parola, in water cup competition, and firstly Ngaon khard first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.