चोसाका सहयोगी तत्त्वावर सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 10:53 PM2019-10-15T22:53:42+5:302019-10-15T22:53:47+5:30
चोपडा : चहार्डी येथील साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने शेतकरी, कामगारांसह अनेक देणी थकीत आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी कारखाना ...
चोपडा : चहार्डी येथील साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने शेतकरी, कामगारांसह अनेक देणी थकीत आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी कारखाना सहयोगी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. यातून येणाऱ्या रकमेच्या विगतवारीबाबत शेतकरी सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
प्रारंभी चोसाकाचे संस्थापक चेअरमन स्व.धोंडूआप्पा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन शेतकरी कृती समितीचे एस.बी.पाटील, भागवत पाटील, तुकाराम पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी केले.
कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी सृष्टी शुगर लि.पुणे या कंपनीला सहयोगी तत्त्वावर देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी विविध कंपन्यांशी चर्चा झाली असून त्यात प्रथम पाच कोटी रुपये देणाºया कंपनीशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मिटकॉन आणि साखर आयुक्तांकडे प्रस्ताव दिला असून त्यांच्या आदेशाने पुढील कार्यवाही होईल. कारखान्यावर ९६ कोटी कर्ज असल्याने त्याची मर्यादा भाडेतत्त्वावर देण्याच्या नियमाच्या कक्षेत येत नसल्यामुळे कारखाना सहयोगी तत्त्वावर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, असे चोसाका चेअरमन अतुल ठाकरे यांनी विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांसमोर सांगितले.
यावेळी माजी आमदार दिलिप सोनवणे, व्हा.चेअरमन शशीकांत देवरे, जि.प.अध्यक्ष गोरख पाटील, संचालक प्रवीण गुजराथी, डॉ.महेंद्र पाटील, संभाजी पाटील, भरत पाटील, अनिल पाटील, निलेश पाटील, सुनिल महाजन, चंद्रशेखर पाटील, अनिल पाटील, आनंदराव रायसिंग, प्रमोद पाटील, बाळासाहेब पाटील, गोपाळ पाटील, सदाशिव पाटील, अकबर पिंजारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव आधार पाटील यांनी केले.