चोसाका एकरकमी कर्जफेड करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:23 AM2021-06-16T04:23:52+5:302021-06-16T04:23:52+5:30
सायंकाळी सहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात असलेल्या चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी ...
सायंकाळी सहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात असलेल्या चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी व्हाईस चेअरमन शशी देवरे, संचालक तथा जिल्हा परिषद माजी सदस्य आनंदराव रायसिंग, नीलेश पाटील, सुनील महाजन, प्रदीप पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक अकबर पिंजारी हे उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना देवरे म्हणाले, बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे चेअरमन राधेश्याम चांडक हे १५ रोजी दुपारी ३ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या सभागृहात आले असता त्यांनी एक रकमी २७ कोटी रुपये कर्जापोटी द्यावेत त्यास संमती दर्शवली व होकार दिला म्हणून राधेश्याम चांडक यांचा सर्वपक्षीय नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, भाजपाचे घनश्याम अग्रवाल, बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे अनंत देशपांडे, विभागीय अधिकारी रमेश पवार, विशाल तोतला, चोसाकाचे माजी चेअरमन ॲड. घनश्याम पाटील, पीपल बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, उद्योजक सुनील जैन, विजय पाटील, संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत चेअरमन अतुल ठाकरे यांनी सर्व संचालकतर्फे राधेश्याम चांडक यांचा सत्कार केला. त्यामुळे यापुढे कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. पुढील प्रक्रियेत जो कोणीही कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेईल त्यांना एकरकमी २७ कोटी रुपये बुलढाणा अर्बन पतसंस्थेस देणे भाग असेल, असेही पत्रकार परिषदेत अतुल ठाकरे यांनी सांगितले. पुणे येथील सहकार आयुक्तालयामार्फत चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या भाडेतत्त्वावर देण्यासाठी ई-टेंडरिंग होईल. त्यानुसार पुढची प्रक्रिया संपन्न होईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.