मुक्ताईनगरात तोतया तृतीयपंथीयांना दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2017 11:31 AM2017-07-06T11:31:32+5:302017-07-06T12:04:45+5:30
ख:या तृतीयपंथीयांचा रुद्रावतार
Next
ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.6 - तृतीयपंथीचे रूप धारण करून वाहन चालकांना अडवीत पैशाची मागणी करणा:या दोन तरुणांना परप्रांतीय ख:या तृतीयपंथीयांनी बेदम चोप देऊन त्यांचे टक्कल केले. दोघा तरुणांना विवस्त्र करून अद्दल घडविल्याची घटना मुंबई-नागपूर महामार्गावर ब:हाणपूर चौफुलीवर घडली.
दोघे बहुरूपी तरुण मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथील आहे. मध्य प्रदेशातून मूर्तिजापूरकडे चारचाकीने जाणा:या चार तृतीयपंथीयांनी केळी घेण्यास ब:हाणपूर चौफुल्लीवर वाहन थांबविले असता.
साडी-चोळी घालून तृतीयपंथीयांचे रूप घातलेले दोन तरुण येथून जाणा:या ट्रक चालकांना थांबून त्यांच्याकडून पैशांची मागणी करीत असल्याचे त्यांना दिसले. हे पाहताच संतप्त झालेल्या ख:या तृतीयपंथीयांनी या दोघांवर हल्ला चढविला. या बहुरूपी तरुणांना बदडणे सुरू केले. शेजारच्या सलूनवरून कात्री आणून दोघांचे टक्कल केले इतक्यावरच न थांबता बघ्यांच्या गर्दीसमोर दोघा तरुणांना निर्वस्त्र केले.